साई संस्थानचे कंत्राटी कामगार तीन महिन्यांपासून पगाराविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 04:32 PM2020-10-23T16:32:01+5:302020-10-23T16:33:26+5:30
गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून साई संस्थानच्या ५९८ कायम कंत्राटी कामगारांच्या विषय अनेकदा चर्चेला येऊनही निर्णय होऊ शकला नाही़. एवढेच नाही तर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा झाला नाही़. काम करून या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शिर्डी : गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून साई संस्थानच्या ५९८ कायम कंत्राटी कामगारांच्या विषय अनेकदा चर्चेला येऊनही निर्णय होऊ शकला नाही़. एवढेच नाही तर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा झाला नाही़. काम करून या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
२७ ऑक्टोबरच्या बैठकीत पगाराचा विषय चर्चेला घेतला जाण्याची शक्यता आहे. शहर स्वच्छतेसाठी नगरपंचायतीला निधी देण्याचा निर्णय संस्थानच्या गेल्या व्यवस्थापनाने घेतला आहे. यासाठी शासनानेही मान्यता दिली आहे. चार महिन्यांपासून हा निधी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शहराच्या स्वच्छतेवर परिणाम झाला आहे.
साधनसामग्री व मनुष्यबळात कपात करण्यात आली आहे. स्वच्छता कामगारांचे कामाचे दिवस कमी करण्याबरोबरच चाळीस टक्के पगार कपात करण्यात येत आहे. यामुळे कामगारांना पाच हजाराच्या आसपास पगार मिळणार आहे. व्यवस्थापन व प्रशासनात एकवाक्यता नसल्याने बैठकीचे निर्णय कायम होण्यातही विलंब होत आहे.