साईदरबारी होलीकात्सव उत्साहात : पारंपरिक पध्दतीने होळी पेटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 PM2021-03-28T16:21:08+5:302021-03-28T16:21:22+5:30

साई संस्थानमध्ये रविवारी पारंपरिकपणे होळी पेटवून वसंतोत्सव साजरा करण्यात आला.

Saidarbari Holikatsav in excitement: Holi was lit in the traditional way | साईदरबारी होलीकात्सव उत्साहात : पारंपरिक पध्दतीने होळी पेटविली

साईदरबारी होलीकात्सव उत्साहात : पारंपरिक पध्दतीने होळी पेटविली

शिर्डी : साई संस्थानमध्ये आज पारंपरिकपणे होळी पेटवून वसंतोत्सव साजरा करण्यात आला. वाईट विचार, विकार, राग, द्वेष, मत्सर यांना भस्मसात करुन मांगल्य निर्माण करणारा हा होलीकात्सव भाविकांच्या जीवनात समृद्धी आणो, कोरोनाचे संकट दूर होवो, असे साकडे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी साईबाबांना घातले.

होळी सणानिमित्ताने समाधी मंदिरातील साई मूर्तीवर साखरेचे गाठी कडे व सुवर्णालंकार घालण्यात आले होते. रविवारी दुपारी मध्यान्ह आरतीपूर्वी गुरुस्थान मंदिरासमोर पारंपरिक पद्धतीने होळी पेटवण्यात आली. रानशेणी गोव-या, ऊस व एरंडाची फांदी याचा या होळीत अंतर्भाव होता. सभोवती सुंदर रांगोळी रेखाटून होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला.

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे व संगीता बगाटे यांच्या हस्ते मंत्रोच्चारात ही होळी पेटवण्यात आली. गणपती पूजनाने या कार्यक्रमाची सुरूवात झाली. तर शिर्डी माझे पंढरपूर.. या साईबाबांच्या आरतीने सांगता करण्यात आली. होळीला पुरण पोळीसह आंब्याच्या रसाचा नैवेद्य दाखवण्यात आला.यावेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, वैशाली ठाकरे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी उपस्थीत होते. या पूजेचे पौरोहित्य दिलीप सुलाखे, अमित देशमुख यांनी केले.

 

Web Title: Saidarbari Holikatsav in excitement: Holi was lit in the traditional way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.