नगरमध्ये सराफांचा जल्लोष

By Admin | Published: May 1, 2016 01:38 AM2016-05-01T01:38:11+5:302016-05-01T01:39:56+5:30

अहमदनगर : सुवर्ण व्यवसायावर केंद्र सरकारने लागू केलेल्या अबकारी करास मद्रास उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्याने शहरातील सराफांनी जल्लोष साजरा केला़

Sail of the city in the city | नगरमध्ये सराफांचा जल्लोष

नगरमध्ये सराफांचा जल्लोष

अहमदनगर : सुवर्ण व्यवसायावर केंद्र सरकारने लागू केलेल्या अबकारी करास मद्रास उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्याने शहरातील सराफांनी जल्लोष साजरा केला़ शनिवारी फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटत आनंद व्यक्त केला.
केंद्र सरकारने देशातील सराफ सुवर्णकार व्यवसायावर अबकारी कर लावण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला होता़ या निर्णयाच्या विरोधात सर्व सराफ व्यावसायिकांनी विरोध करत आंदोलन केले़ सरकारने मात्र, काहीच निर्णय न दिल्याने सराफांनी २७ एप्रिलला संप मागे घेतला होता़ कोईम्बतूर सराफ संघटनेने मद्रास हायकोर्टात दाखल केलेल्या पिटीशनवर उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनी शुक्रवारी सायंकाळी निर्णय देत या अबकारी करास ३ जूनपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे़ न्यायालयाच्या या निर्णयाचा सराफ संघटनांनी स्वागत केले आहे. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे शहरात शुक्रवारी रात्री सराफ व्यावसायिकांनी स्वागत करून सराफ बाजारात फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला़
यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष वर्मा म्हणाले, केंद्र सरकारने सराफ व्यवसायावर लादलेल्या अबकारी करास एकजुटीने विरोध केला. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलने केली. मात्र, सरकारला जाग आली नाही.
या संपादरम्यान कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचे नुकसान सरकारचे होत होते तरीही सरकारने योग्य न्याय दिला नाही. मात्र मद्रास हायकोर्टाने सराफ व्यावसायिकांनच्या भावना समजून घेत या अबकारी करास स्थगिती देऊन न्याय दिला आहे. सर्व सराफ व्यावसायिकांनी एकजुटीने व सहनशीलपणे या काळ्या कायद्यास विरोध केल्याने उशिरा का होईना पण न्याय मिळाला आहे, असे ते म्हणाले़
यावेळी सराफ संघटनेचे जिल्हा सचिव प्रमोद बुऱ्हाडे, अभय कांकरिया, प्रकाश डहाळे, अजय बोरा, बाळासाहेब काबरा, संतोष देडगावकर, गोपाल वर्मा, मुकुंद रत्नापूरकर व सराफ व्यावसायिक उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Sail of the city in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.