वळवाच्या पावसाने साईनगरी चिंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 07:42 PM2020-05-14T19:42:24+5:302020-05-14T19:42:32+5:30
शिर्डी: गेल्या काही दिवसांपासून उन्हाने बेजार झालेली साईनगरी वळवाच्या पावसाने चिंब न्हाऊन निघाली. गुरुवारी दुपारी वाºयासह हलकासा पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा आला.
शिर्डी: गेल्या काही दिवसांपासून उन्हाने बेजार झालेली साईनगरी वळवाच्या पावसाने चिंब न्हाऊन निघाली. गुरुवारी दुपारी वाºयासह हलकासा पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा आला.
आठवडा भरा पासून ऊन-सावल्याचा खेळ सुरू होता. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मात्र अचानक टपोरे थेंब धरतीवर पडू लागले. तत्पूर्वी सोसाट्याचा वारा व गडगडणाºया मेघांनी पावसाचे पूर्व संकेत दिले होते.
पावसाला सुरवात होताच मातीचा सुगंध दरवळला. तब्बल अर्धा तास सुरू असलेल्या पावसाने शिर्डीत सगळीकडे पाणीच पाणी झाले. झाडावरील धूळ वाहून गेल्याने झाडांची हिरवाई नजरेत भरू लागली. अनेक दिवसांपासून सगळेजण कोरोनाच्या दडपणाखाली वावरत असतांना पावसाच्या शिडकावा प्रत्येकाच्या मनाला आनंद देऊन गेला. शिडीर्तील या वळवाच्या पावसात अनेक लहानग्या बरोबर तरुणांनी सुद्धा भिजण्याचा आनंद लुटला. गेले महिनाभर सुरू असलेला उकाडा पावसाने क्षणात पळवून लावला.