जिल्हास्तरीय समितीद्वारे सैनिक परिवारास न्याय मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:22 AM2021-09-11T04:22:34+5:302021-09-11T04:22:34+5:30

माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने पोलीस अधीक्षक व जिल्हा सैनिक कल्याण बोर्डने बनवलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यांचा ...

The Sainik family will get justice through the district level committee | जिल्हास्तरीय समितीद्वारे सैनिक परिवारास न्याय मिळेल

जिल्हास्तरीय समितीद्वारे सैनिक परिवारास न्याय मिळेल

माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने पोलीस अधीक्षक व जिल्हा सैनिक कल्याण बोर्डने बनवलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यांचा शुक्रवारी सन्मान करण्यात आला. यावेळी नागरे बोलत होते. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय वाकचौरे, उप अधिकारी दत्तात्रय शिंदे, संर्पक अधिकारी बाळासाहेब ठाणगे उपस्थित होते.

जय हिंदचे शिवाजी पालवे यांनी पोलीस स्टेशनला आजी-माजी सैनिकांचे अनेक प्रकरणे प्रलंबित असून, ते प्रश्न सुटण्यासाठी समितीच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली. समितीमधील तालुका प्रतिनिधी सहदेव घनवट (पारनेर), मनसुक वाबळे (नगर), प्रभाकर जगताप (अकोले), महादेव आव्हाड (नेवासा), बजरंग डोके (जामखेड), बाळासाहेब उंडे (श्रीरामपूर), भाऊसाहेब रानमाळ (कर्जत), शांतीलाल होन (कोपरगाव), संदीप गुंजाळ (संगमनेर), सुनील देशमुख (राहाता), सुभाष रणशिंग (श्रीगोंदा), प्रवीण पठारे (राहुरी), बापूसाहेब लोमटे (शेवगाव), शिवाजी पालवे (पाथर्डी) यांचा फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Web Title: The Sainik family will get justice through the district level committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.