साईचरणी साडेसहा कोटींचे दान
By Admin | Published: April 7, 2017 09:38 PM2017-04-07T21:38:30+5:302017-04-07T21:38:30+5:30
देश-विदेशातून आलेल्या भाविकांनी साईबाबांच्या झोळीत रोख व वस्तू रूपाने तब्बल साडेसहा कोटी सहा लाखांचे विक्रमी दान अर्पण केले़ यात जवळपास सव्वा दोन लाखांच्या परकीय चलनाचाही समावेश आहे़
श र्डी : रामनवमी उत्सवकाळात देश-विदेशातून आलेल्या भाविकांनी साईबाबांच्या झोळीत रोख व वस्तू रूपाने तब्बल साडेसहा कोटी सहा लाखांचे विक्रमी दान अर्पण केले़ यात जवळपास सव्वा दोन लाखांच्या परकीय चलनाचाही समावेश आहे़रामनवमी काळातील दानपेट्यांची शुक्रवारी मोजदाद करण्यात आली़ यात दक्षिणा पेट्यांमध्ये १ कोटी ५४ लाख रुपये रोख, तसेच ६ लाख ३३ हजार रुपये किमतीचे २६१ ग्रॅम सोने व ८६ हजार रुपये किमतीची २ हजार ७०० ग्रॅम चांदी जमा झाली़ उत्सवकाळात भाविकांनी आॅनलाइन देणगीद्वारे २२ लाख ६८ हजार रुपये पाठविले. तर चेक डी.डी द्वारे १२ लाख ९३ हजार , मनिआॅर्डरद्वारे २ लाख ३८ हजार, डेबिट कार्डच्या माध्यमातून १८ लाख संस्थानच्या तिजोरीत जमा झाले़ याशिवाय विदेशी भाविकांनी जवळपास २ लाख ३३ हजारांचे परकीय चलन साईबाबांच्या झोळीत अर्पण केले़ यात आॅस्ट्रेलिया, कॅनडा, कुवेत, मलेशिया, नेपाळ, कतार, सिंगापूर, अमेरिका, इंग्लंड, थायलंड, श्रीलंका, आफ्रिका, सौदी अरेबिया या देशांतील परकीय चलनांचा समावेश आहे.हैद्राबादच्या भाविकाने साईमंदिरातील समाधीच्या कठड्यांना जवळपास साडेतीन कोटींचे बारा किलो सोने लावले. आग्रा येथील भाविक दांपत्यानेही द्वारकामाईत छत्तीस लाखांचे चांदीचे मखर बसवले़ एका भाविकाने संस्थानला दोन चांदीच्या दक्षिणा पेट्या भेट दिल्या़ त्यांची किंमत जवळपास साडेचार लाख रुपये आहे़ संस्थानच्या विविध बँकांमध्ये अठराशे कोटींच्या ठेवी, तीनशे ऐंशी किलो सोने व साडेचार हजार किलो चांदी जमा आहे़