गाव पातळीवर नोंदणी व्हावी, या मागण्यांसाठी अपंगांचा पाथर्डीत मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:03 PM2018-03-21T22:03:00+5:302018-03-21T22:04:12+5:30
ग्रामपंचायतीमध्ये अपंगाची नोंदणी व्हावी, अपंगांसाठीचा निधी प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने बुधवारी पाथर्डी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चात अपंग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पाथर्डी : गाव पातळीवर ग्रामपंचायतीमध्ये अपंगाची नोंदणी व्हावी, अपंगांसाठीचा निधी प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने बुधवारी पाथर्डी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चात अपंग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चा पंचायत समिती कार्यालयावर आल्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, रविंद्र वायकर, गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली. हुमायून आतार व महादेव लाड यांनी अपंगाची ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी करावी, अपंगासाठीचा तीन टक्के निधी ग्रामपंचायतीला मिळावा, अशी मागणी केली. गटविकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे यांनी ग्रामसेवकांना सूचना देवून अपंग नोंदणी प्राधान्याने करून घेतली जाईल तसेच निधीही तातडीने देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
मोर्चात संघटनेचे अध्यक्ष महादेव लाड , हुमायून आतार, सुनील पाखरे, शुभांगी खेले, बंडू खाडे, संगीता मरकड, विठ्ठल गोल्हार, नारायण आव्हाड, अहमद शेख, भाऊसाहेब राजगुरू, पंडित पवार, मंगल बडे, चंद्रकांत बेंद्रे, महेश अंगारखे आदी सहभागी झाले होते.