अंघोळीला गेलेले सख्खे भाऊ मुळा नदीच्या पात्रात बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:10 PM2020-05-30T22:10:50+5:302020-05-30T22:10:58+5:30
घारगाव : नदीपात्रात अंघोळीला गेलेले दोन सख्खे भाऊ बुडाले. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जांबूत बुद्रूक येथील खैरदरा परिसरातून वाहणाºया मुळा नदीपात्रात घडली.

तेजस शरद कातोरे (वय ९) व सुरज शरद कातोरे (वय ५) असे मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत. शरद कातोरे हे कुटूंबासमवेत खैरदरा येथे राहतात. त्यांची दोन मुले तेजस व सूरज हे घरापासून जवळच असलेल्या मुळा नदीपात्रात अंघोळीला गेले होते. मात्र, पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्यामुळे हे दोघेही पाण्यात बुडाले. बराच वेळ होऊनही ते घरी न आल्याने कुटुंबातील सदस्य त्यांना पाहण्यासाठी गेले. त्यावेळी या दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगत होते. ही माहिती मिळाल्यानंतर घारगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून ते शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकाºयांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.