साकळाई योजनेचा सर्व्हे ८ दिवसांत होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 03:36 PM2019-03-01T15:36:32+5:302019-03-01T15:36:41+5:30

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी गावांना वरदान ठरणारी साकळाई पाणी योजनेसाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पाठपुरावा केला.

Sakhalai scheme will start in 8 days | साकळाई योजनेचा सर्व्हे ८ दिवसांत होणार सुरू

साकळाई योजनेचा सर्व्हे ८ दिवसांत होणार सुरू

ठळक मुद्देदिपाली सय्यद यांची मुख्यमंत्र्याशी चर्चा

केडगाव : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी गावांना वरदान ठरणारी साकळाई पाणी योजनेसाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पाठपुरावा केला. या योजनेच्या कामाचा सर्व्हे आठ दिवसात सुरू होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती दिपाली सय्यद यांनी दिली.
नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३५ दुष्काळी गावांसाठी साकळाई योजना मंजूर व्हावी यासाठी कृती समिती आणि योजनेत येणा-या गावांचा लढा सुरू आहे. मागील महिन्यात दिपाली सय्यद यांच्या नेतृत्वाखाली रुई छत्तीशी येथे आदोंलन करण्यात आले होते. साकळाई योजनेसाठी पुढाकार घेणार असून मुख्यमंत्र्याना भेटणार असल्याचे जाहिर केले होते. मात्र दिपाली सय्यद यांच्या आधीच डॉ. सुजय विखे व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्याना भेटून हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. त्यावेळी साकळाई कृती समितीतही फाटाफूट होत काही विखेंसोबत तर काही पाचपुते सोबत विभागले गेले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा सर्व्हे करण्याचा आदेश दिला. आदेश देऊनही पुन्हा काहीच हालचाली न झाल्याने साकळाई कृती समितीने जिल्हयात तर दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची गुरुवारी भेट घेऊन निवेदन दिल. साकळाईचा सर्व्हे येत्या आठ दिवसात सुरू होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिल्याची माहिती दिपाली यांनी लोकमत ला दिली. याच प्रश्नासाठी मंत्री गिरीष महाजन यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी समाजसेवक राजाराम भापकर गुरूजी, बाबा महाराज झेंडे, भाऊसाहेब शिंदे, सोमनाथ घाडगे, बाळासाहेब नलगे, सूर्यभान कोतकर दादासाहेब जगताप उपस्थित होते.

Web Title: Sakhalai scheme will start in 8 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.