समाजवादी जनपरिषदेचे संगमनेरातील टोलनाक्यावर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 11:54 AM2020-12-12T11:54:03+5:302020-12-12T11:54:44+5:30
केंद्रीय कृषी व कामगार विधेयक हे शेतकरी व कामगारांवर अन्याय करणारे आहेत. असा आरोप करत ही विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवारी ( दि.१२) नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर समाजवादी जनपरिषद, संगमनेर तालुका अंगणवाडी कर्मचारी सभा यांच्यावतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
संगमनेर : केंद्रीय कृषी व कामगार विधेयक हे शेतकरी व कामगारांवर अन्याय करणारे आहेत. असा आरोप करत ही विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवारी ( दि.१२) नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर समाजवादी जनपरिषद, संगमनेर तालुका अंगणवाडी कर्मचारी सभा यांच्यावतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अंगणवाडी कर्मचारी सभेच्या प्रदेशाध्यक्षा निशा शिवूरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.