समशेरपूरला कोरोनाबाधित रुग्ण आढळला; भाजीपाला घेऊन गेला होता मुंबईला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 04:27 PM2020-06-17T16:27:13+5:302020-06-17T16:27:54+5:30
अकोले तालुक्यातील मुंबईवरुन आलेला लिंगदेव येथील पहिला रुग्ण कोरोनावर मात करुन घरी येतो न येतो तोच समशेरपूर येथील कल्याण-मुंबई येथे भाजीपाला घेवून गेलेला ५० वर्षीय व्यक्ती बुधवारी कोरोनाबाधित आढळून आली. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजीत गंभीरे यांनी दिली.
अकोले : तालुक्यातील मुंबईवरुन आलेला लिंगदेव येथील पहिला रुग्ण कोरोनावर मात करुन घरी येतो न येतो तोच समशेरपूर येथील कल्याण-मुंबई येथे भाजीपाला घेवून गेलेला ५० वर्षीय व्यक्ती बुधवारी कोरोनाबाधित आढळून आली. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजीत गंभीरे यांनी दिली.
अकोले तालुक्यात कोरोनाचा शिरकाव २३ मे रोजी झाला. लिंगदेव येथील मुंबई घाटकोपरहून आलेली ५६ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित निघाली होती. ही व्यक्ती सर्वात शेवटी कोरोनावर मात करुन मंगळवारी आपल्या घरी पोहोचली.
दरम्यान तालुक्यातील १९ व्यक्ती टप्प्याटप्याने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. सर्वांनी कोरोनावर मात करुन सुखरुप आपआपल्या घरी आल्या आहे.
बुधवारी आमदार डॉ.किरण लहामटे यांनी पंचायत समिती सभागृहात तालुका आढावा बैठक घेतली. १९ बाधितांनी कोरोनावर मात केल्याची समाधानकारक माहिती डॉ. गंभीरे यांनी दिली. पण लागलीच एक कोरोना पॉझीटिव्हची बातमी सभागृहात धडकली आणि आरोग्य विभागाचे पथक समशेपूरकडे रवाना झाले.