वाळूतस्करांची बोट स्फोटाने उडविली : सांगवी दुमाला शिवारात भीमा नदीत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 08:12 PM2019-02-27T20:12:38+5:302019-02-27T20:14:00+5:30
सांगवी दुमाला शिवारातील भीमा नदी पात्रात श्रीगोंदा पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकून विनापरवाना वाळूने भरलेल्या दोन ट्रक जप्त केल्या
श्रीगोंदा : सांगवी दुमाला शिवारातील भीमा नदी पात्रात श्रीगोंदा पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकून विनापरवाना वाळूने भरलेल्या दोन ट्रक जप्त केल्या. तर वाळूचा उपसा करणारी एक बोट जिलेटिनचा स्फोट घडवून उद्ध्वस्त करण्यात आली. मात्र एका बड्या वाळूतस्कराचा बेकायदा वाळू उपसा करणारा जेसीबी कारवाई न करता सोडून देण्यात आला.
पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई करून १४ लाख रूपये किंमतीची वाहने व वाळू जप्त केली. पोलीस काँस्टेबल अमोल अजबे यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यावरून अप्पा राठोड (रा. सोनवडी, ता. दौंड), ज्ञानदेव मदने (रा. सांगवी, ता. श्रीगोंदा) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आली आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पण बड्या वाळू तस्करांचा जेसीबी सोडून दिल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.