ऐन लॉकडाऊनमध्ये मातुलठाण येथे वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:20 AM2021-05-12T04:20:30+5:302021-05-12T04:20:30+5:30

गोदावरी नदीतील वाळूचा लिलाव नाशिक जिल्ह्यातील एका ठेकेदाराने घेतला आहे. १६ फेब्रुवारीला प्रत्यक्ष लिलावाच्या जागेचा त्याला ताबा देण्यात आला. ...

Sand extraction at Matulthan in Ann Lockdown | ऐन लॉकडाऊनमध्ये मातुलठाण येथे वाळू उपसा

ऐन लॉकडाऊनमध्ये मातुलठाण येथे वाळू उपसा

गोदावरी नदीतील वाळूचा लिलाव नाशिक जिल्ह्यातील एका ठेकेदाराने घेतला आहे. १६ फेब्रुवारीला प्रत्यक्ष लिलावाच्या जागेचा त्याला ताबा देण्यात आला. मात्र चार हजार ब्रासचा लिलाव असताना ठेकेदाराने दोन लाख ब्रास वाळूचा उपसा केला. पोकलेन, जेसीबी, हायवा, डंपरच्या मदतीने बेकायदेशीर उपसा केला करण्यात आला.

ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी व माध्यमांनी याविरुद्ध आवाज उठविला. नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशाविरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला.

त्यानंतर ठेकेदाराने येथून काम बंद करत पळ काढला.

दरम्यानच्या काळात येथील वाळू उपसा पूर्णपणे बंद झाला. मात्र ७ मेपासून लिलावधारकाने पुन्हा वाळू उपसा सुरू केला आहे. महसूल व पोलीस प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. वास्तविक पाहता लिलावधारकाने लाखो ब्रासचा उपसा केलेला असताना लिलावाच्या जागेचा रितसर पंचनामा करून संबंधित ठेकेदरावर दंडात्मक कार्यवाही होणे आवश्यक होते. मात्र महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा वाळू उपसण्यासाठी परवानगी दिल्याचे यातून उघड झाले आहे.

संपूर्ण राज्यात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. असे असताना मातुलठाण येथे वाळू उपशास परवानगी दिली कशी? असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.

मातुलठाण गावात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. आता गाव पूर्वपदावर येत असताना पुन्हा महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी वाळू उपशास परवानगी दिली आहे. कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्यास महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

ठेकेदाराने १० ते १५ गावांतील ५०० ते १००० मजुरांना वाळू भरण्यासाठी आणले आहे. त्यामुळे गावात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात होणार आहे. याची सर्व जबाबदार आपणावर राहील तसेच वाळू उपशाचा पंचनामा करून कार्यवाही न केल्यास दिनांक १५ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला आहे.

----

वाळू उपशाला वाढता विरोध

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, कोपरगावचे शहराध्यक्ष कलविंदर दडियाल, राहाता उपतालुका प्रमुख भास्कर मोटकर यांनी पाठिंबा दिला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यभर जमावबंदी असताना अत्यावश्यक बाब म्हणून मातुलठाण येथे वाळू उपशाला विशेष सूट देण्यात आली आहे का? असा सवाल झावरे यांनी केला आहे.

Web Title: Sand extraction at Matulthan in Ann Lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.