नगर जिल्ह्यात आता परराज्यातून वाळू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:21 AM2021-02-10T04:21:35+5:302021-02-10T04:21:35+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याने गौण खनिज विभागाने १४ वाळू घाटांच्या लिलावासाठी ई-निविदेची तिसरी फेरी ...

Sand in the Nagar district now from abroad | नगर जिल्ह्यात आता परराज्यातून वाळू

नगर जिल्ह्यात आता परराज्यातून वाळू

अहमदनगर : जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याने गौण खनिज विभागाने १४ वाळू घाटांच्या लिलावासाठी ई-निविदेची तिसरी फेरी जाहीर केली आहे. दरम्यान जिल्ह्यात आता परराज्यातून वाळू येऊ लागली आहे. परराज्यातून येणाऱ्या वाळू वाहतुकीबाबत राज्य शासनाने नवी नियमावली जाहीर केली आहे.

जिल्ह्यातील १८ वाळू घाटांचे लिलाव करण्यास राज्यस्तरीय समितीने मंजुरी दिली होती. त्यापैकी तीन वाळू साठे शासकीय कामासाठी राखीव ठेवण्यात आले होते, तर लिलावाच्या पहिल्या फेरीत संगमनेर तालुक्यातील एका वाळू साठ्याचा लिलाव झाला. राहिलेल्या १४ साठ्यांसाठी दुसरी फेरी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्येही प्रतिसाद न मिळाल्याने आता प्रशासनाने तिसरी फेरी जाहीर करण्यात आली आहे. १० ते २४ फेब्रुवारी या कालावधीत ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खुर्द, नायगाव, मातुलठाण, कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण, संवत्सर, जेऊर कुंभारी, जेऊर पाटोदा, राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द, पिंप्री वळण, चंडकापूर, वळण, रामपूर, सात्र‌ळ, राहाता तालुक्यातील पुणतांबा, रस्तापूर येथील वाळू साठ्यांचा लिलाव होणार आहे.

दरम्यान जिल्ह्यात वाळू साठ्यांचे लिलाव बंद आहेत. अवैध वाळू उपसा सुरू असला तरी जिल्ह्यात वाळूची उपलब्धता अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे परराज्यातून वाळूची आवक सुरू झाली आहे. ही बाब लक्षात घेता परराज्यातून येणाऱ्या वाळूसाठी शासनाने एका परिपत्रकान्वये नियमावली जाहीर केली आहे. परराज्यातून आलेल्या वाळूची महाखनिज या संगणकीय प्रणालीत नोंद करणे आवश्यक राहील. सदरची वाळू वैध मार्गाने आली का याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी क्षेत्रीय पथके तैनात करण्यात येणार आहेत. थेट बांधकामाच्या ठिकाणी वाळू नेणार असल्यास वैध वाहतूक पास असणे आवश्यक राहणार आहे. परराज्यातून आणलेली वाळू विकली जाणार असेल तर त्यासाठी व्यापारी परवाना आवश्यक राहणार आहे. स्वामित्वधनाच्या १० टक्के प्रतिब्रास रक्कम गौण खनिज कार्यालयात भरणे अनिवार्य राहणार आहे. वाळूचा साठा करणार असल्यास जी जागा अकृषक असणे आवश्यक राहणार आहे.

-------------

पहिल्या फेरीत एका साठ्याचा लिलाव झाला. १४ साठ्यांसाठी लिलावाच्या दुसऱ्या फेरीतही प्रतिसाद न मिळाल्याने तिसरी फेरी जाहीर करण्यात आली आहे. सध्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. बोटीद्वारे पाणी उपसा करण्यास कायद्याने बंदी आहे. त्यामुळे लिलाव घेण्यास ठेेकेदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते आहे. तिसऱ्या फेरीत काय प्रतिसाद मिळतो, ते पाहणे महत्त्वाचे आहे.

-वसिम सय्यद, खनिकर्म अधिकारी, गौण खनिज विभाग

--फाईल फोटो- सँड

Web Title: Sand in the Nagar district now from abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.