पोलिसांना धक्काबुक्की करुन वाळू तस्करांनी पळविला टेम्पो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 03:59 PM2020-02-16T15:59:57+5:302020-02-16T16:00:44+5:30
प्रतापपूर गावातील नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणा-या टेम्पोवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करीत टेम्पोसह वाळू तस्कर पळून गेले. याप्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आश्वी : संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर गावातील नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणा-या टेम्पोवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करीत टेम्पोसह वाळू तस्कर पळून गेले. याप्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई भागा धिंदळे यांनी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. शनिवारी (दि.१५) रात्रीची गस्त घालत होते. साडेबारा वाजण्याच्या सुमारास प्रतापपूर गावाच्या प्रवरा नदीपात्रात टेम्पोमध्ये चोरुन वाळू भरत असल्याची माहिती मिळाली. आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना भ्रमणध्वनीव्दारे मिळाली. त्यांनी रात्रीचा गस्तवर असलेले पोलीस शिपाई भागा धिंदळे व सरकारी वाहन चालक संदीप रोकडे यांना देऊन खात्री करण्यास सांगितला. प्रतापपूर शिवारातील नदीपात्रात जाऊन पाहणी करीत असताना टेम्पो (क्र. एम. एच.१४, ए. एस.३५२२) मध्ये वाळू भरत असलेल्याचे दिसले. यावेळी पोलिसांना पाहून वाळू तस्करांनी टेम्पो सोडून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करुन रवींद्र उर्फ बंटी साहेबराव मदने (रा.आश्वी बुद्रुक), दत्तू सुभाष पवार, रवींद्र अजिनाथ रजपूत (रा.चंद्रपूर) या तिघांना पकडले. धनंजय पंढरीनाथ ठाकुर, अजय विजय बरडे, मच्छिंद्र सोपान माळी पळून गेल्याचे सांगितले. पोलिसांनी टेम्पोसह तिघांना आश्वी पोलीस स्टेशनला आणत असताना प्रतापूर गावातील एसटी स्टँडजवळ टेम्पो थांबवला. आश्वीहून आलेल्या लखन साहेबराव मदने याने मोटरसायकल आडवी लावत गाडीत बसलेले पोलीस शिपाई भागा धिंदळे यांना टेम्पोतून खाली उतरवत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यानंतर टेम्पोसह वाळू तस्कर पळून जाण्यात यशस्वी झाले. आश्वी पोलिस ठाण्यात आरोपी लखन साहेबराव मदने याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.