केडगाव दुहेरी हत्याकांडातील संदीप गि-हे आणि महावीर मोकळेला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 03:24 PM2018-04-14T15:24:21+5:302018-04-14T15:25:44+5:30

केडगाव दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी संदीप बाळासाहेब गि-हे व महावीर ऊर्फ पप्पू रमेश मोकळेस न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली़ त्यानंतर आज दोघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले

Sandeep Gi of Kedgaon double murder and Mahavir Mokle have been remanded in police custody | केडगाव दुहेरी हत्याकांडातील संदीप गि-हे आणि महावीर मोकळेला पोलीस कोठडी

केडगाव दुहेरी हत्याकांडातील संदीप गि-हे आणि महावीर मोकळेला पोलीस कोठडी

अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी संदीप बाळासाहेब गि-हे व महावीर ऊर्फ पप्पू रमेश मोकळेस न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली़ त्यानंतर आज दोघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने १९ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली.
शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची ७ एप्रिल रोजी केडगाव येथे हत्या झाली होती़ संदीप गुुंजाळ याच्यासह संदीप बाळासाहेब गि-हे व महावीर मोकळे, तसेच गि-हे याचा मित्र (नाव माहीत नाही) यांनी ही हत्या केली. हत्याकांडानंतर संदीप गुंजाळ हा पारनेर पोलीस ठाण्यात स्वत: हजर झाला होता़ गि-हे व मोकळे फरार झाले होते. काल पोलीसांनी या दोघांनाही अटक केली.

Web Title: Sandeep Gi of Kedgaon double murder and Mahavir Mokle have been remanded in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.