केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी संदीप गुंजाळचा ‘नार्को’स ठाम नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 09:38 PM2018-05-09T21:38:59+5:302018-05-09T21:42:04+5:30
केडगाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी प्रमुख आरोपी संदीप गुंजाळ याने नार्को तपासणी करण्यास नकार दिला आहे. तर यातील दुसरा आरोपी विशाल कोतकर याला गुरूवारी न्यायालयात हजर करून त्याचे नार्कोबाबत म्हणणे घेतले जाणार आहे.
अहमदनगर : केडगाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी प्रमुख आरोपी संदीप गुंजाळ याने नार्को तपासणी करण्यास नकार दिला आहे. तर यातील दुसरा आरोपी विशाल कोतकर याला गुरूवारी न्यायालयात हजर करून त्याचे नार्कोबाबत म्हणणे घेतले जाणार आहे.
केडगाव दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी संदीप गुंजाळ, विशाल कोतकरसह इतर नऊ आरोपींना अटक केली आहे. संदीप गुंजाळ या हत्याकांडातील मारेकरी असून त्याला विशाल कोतकरने पाठवले होते, असे पोलीस तपासात पुढे आले आहे. परंतु हे दोघेही विसंगत माहिती देत असून, महत्वपूर्ण माहिती पोलिसांपासून दडवत आहेत, अशी खात्री झाल्याने पोलिसांनी या दोघांच्या नार्कोसह इतर सहा मानसशास्त्रीय चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली. नार्को करण्याआधी आरोपींची परवानगी घेणे बंधनकारक असते. त्यानुसार गुंजाळ याचे लेखी म्हणणे घेतले असता त्याने या चाचणीस ठाम नकार दिला आहे. त्यामुळे पोलिसांना आता त्याची नार्को करता येणार नाही. दुसरीकडे विशाल कोतकरला गुरूवारी न्यायालयात हजर केले जाणार असून, त्याच्याकडूनही नार्कोबाबत संमती घेतली जाणार आहे. त्यानंतर दोघांच्या नार्कोसंदर्भातील अर्जांवर सुनावणी होईल.