संगमनेर भाजपने घेतला बूथ समितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:20 AM2021-03-08T04:20:52+5:302021-03-08T04:20:52+5:30
संगमनेर येथील भाजपा जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी, विविध आघाडी प्रमुख, गटप्रमुख, गण प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख ...
संगमनेर येथील भाजपा जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी, विविध आघाडी प्रमुख, गटप्रमुख, गण प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख या सर्वांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी यांनीही मार्गदर्शन केले.
अनासपुरे यांनी बूथ आढावा घेण्यापूर्वी आजच भाजपा महाराष्ट्र प्रदेश बैठकीत झालेले कामकाज आणि ठराव उपस्थितांसमोर मांडले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचेही थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले. बूथ रचनेचा आढावा घेताना अनासपुरे यांनी भाजप हा आपल्या संघटनेचा लोकहितासाठी वापर करणारा एकमेव पक्ष असल्याचे प्रतिपादन केले. पक्षाची संघटना बूथ पातळीपर्यंत मजबूत करण्याचा उद्देश केवळ सत्ता मिळविणे हा नसून सरकारच्या लोकोपयोगी योजना तळागाळातील गरजूंपर्यंत पोहचविणे, यातून सोपे होणार आहे. ज्याचे अंतिम पर्यवसान 'सबका साथ, सबका विकास' अर्थात देशाच्या विकासातच होणार आहे. यावेळी अनासपुरे यांनी बूथ पातळीवर करावयाची २३ कामे समजावून सांगितली.
८ एप्रिल रोजी महिला दिन आहे. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या, स्वच्छता, आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करून सन्मान करावा. ६ एप्रिल रोजी भाजपा पक्ष स्थापना दिवस, १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रत्येक बुथवर साजरी करावी, असे आवाहन अनासपुरे यांनी केले.
प्रास्तविक अभियांत्रिकी सेलचे जिल्हाध्यक्ष हरीश चकोर यांनी केले. सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस वैभव लांडगे यांनी केले. नीलेश वाडेकर यांनी आभार मानले.
तालुकाध्यक्ष डॉ.अशोक इथापे, सुधाकर गुंजाळ, राजेंद्र सांगळे, मेघा भगत, श्रीराज डेरे, सतीश कानवडे, आसिफ पठाण, रामचंद्र जाजू, काशिनाथ पावसे, सुनीता कानवडे, कोंडाजी कडनर, योगीराज परदेशी, कल्पेश पोगुल, दिनेश सोमाणी, वाल्मीक शिंदे, नानासाहेब खुळे, नेताजी घुले, दीपक भगत,भारत गवळी, शिवकुमार भंगीरे, दिलीप रावल,जग्गू शिंदे, नासीरखान पठाण,मनोज जुंदरे, स्वप्नील उपासनी, रोहित चौधरी, कांचन ढोरे, रेश्मा खांडरे, ज्योती भोर यांच्यासह संगमनेर शहर व तालुक्यातील कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.