संगमनेरमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 03:55 PM2019-06-09T15:55:04+5:302019-06-09T15:55:10+5:30
घारगाव पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला
घारगाव : घारगाव पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला. रविवारी सकाळी ही कारवाई केली. त्यामधील ४ ब्रास वाळूसह सुमारे १० लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन जण पसार झाले असून अज्ञातांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाजगी पिकअप वाहनातून साकुर परिसरात अवैध वाळू उपशाविषयी माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक भुसारे यांना गुप्त खब-यामार्फत संगमनेर तालुक्यातील पठारभागातील खैरदरा शिवारात जांबुत बु येथे मुळा नदीपात्रात अज्ञात आरोपी विनापरवाना वाळू उपसा करून एक डंपर भरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस नदीपात्रात जाऊन कारवाईवेळी डंपर चालक व एक अज्ञात आरोपी यांनी वाहन, मोबाईल असे साहित्य त्याठिकाणी सोडून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून एक डंपर (क्रमांक.एम.एच.१४ जी.यु.७७९७) दोन मोबाईल, ४ ब्रास वाळू, यांसह एकूण १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित डंपर चा मालक कोण आहे, हे अद्याप कळू शकले नाही.
दरम्यान,याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांनी दिलेल्या फियार्दीवरून दोन अज्ञातांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश मोहिते करीत आहे.