संगमनेर : गज कापून दोन आरोपींचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:59 AM2019-06-21T10:59:26+5:302019-06-21T15:37:16+5:30
संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून दोन आरोपींनी पहाटेच्या सुमारास पलायन केले. कारागृहाचे तीन गज कापून आरोपी पळून गेले.
संगमनेर : संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून दोन आरोपींनी पहाटेच्या सुमारास पलायन केले. कारागृहाचे तीन गज कापून आरोपी पळून गेले. याबाबत पोलीस नाईक श्रीपत नाईक यांनी फिर्याद दाखल केली आहे.
विशाल तांदळे (रा.मंचर जि.पुणे) आणि कलिम पठाण(निंबाळे चौफुली, संगमनेर) अशी या आरोपींची नावे आहेत. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आरोपींना गज कापून पलायन केले. पळून जाताना ड्युटीवर असणारे फियार्दी श्रीपत नाईक यांनाही धक्काबुक्की केली. दरम्यान गज कापण्यासाठी शस्त्र कोणी पुरवले याचा तपास सुरू आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार करत आहेत.