Video - ‘देवगड’च्या यात्रेत अश्वाची बुलेटस्वारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 01:06 PM2019-02-20T13:06:58+5:302019-02-20T14:17:48+5:30

संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड (हिवरगाव पावसा) येथील अश्वप्रदर्शनातील अश्वांच्या नृत्य स्पर्धेत यंदा संगमनेरकरांनी अश्वाची बुलेटस्वारी अनुभवली.

SANGAMNER DEVGAD YATRA HORSE SHOW | Video - ‘देवगड’च्या यात्रेत अश्वाची बुलेटस्वारी 

Video - ‘देवगड’च्या यात्रेत अश्वाची बुलेटस्वारी 

ठळक मुद्देसंगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील अश्वप्रदर्शनातील अश्वांच्या नृत्य स्पर्धेत यंदा संगमनेरकरांनी अश्वाची बुलेटस्वारी अनुभवलीमालकासोबत बुलेटवर स्वार झालेला अश्व यंदाच्या प्रदर्शनाचे आकर्षण ठरला. अश्वांच्या चित्तथरारक कसरती व त्यांच्या नृत्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. 

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड (हिवरगाव पावसा) येथील अश्वप्रदर्शनातील अश्वांच्या नृत्य स्पर्धेत यंदा संगमनेरकरांनी अश्वाची बुलेटस्वारी अनुभवली. मालकासोबत बुलेटवर स्वार झालेला अश्व यंदाच्या प्रदर्शनाचे आकर्षण ठरला. अश्वांच्या चित्तथरारक कसरती व त्यांच्या नृत्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. 

हिवरगाव पावसा येथे भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मल्हारी मार्तंड खंडेरायाचे देवस्थान आहे. येथे माघ पौर्णिमेदिवशी भरणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त गत चार वर्षांपासून संगमनेर अश्वप्रेमी असोसिएशनचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अश्व व पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे पाचवे वर्ष असून मंगळवारी (१९ फेब्रुवारी) आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे, आयोजक रणजितसिंह देशमुख, सचिन जगताप, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, फलटणचे माजी नगराध्यक्ष रघुनाथराजे निंबाळकर, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, आर. बी. राहाणे आदीं मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

या प्रदर्शनात महाराष्ट्रासह हरयाणा, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यातील अश्वपालक आपल्या लाखो रुपये किंमतीच्या देशी-विदेशी जातिवंत अश्वांसह सहभागी झाले होते. प्रदर्शनाबरोबरच अश्वांच्या नृत्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यात त्यांचे नृत्य, चित्तथरारक कसरती, मागील दोन पायांचा उपयोग करून चालणे, गादीवर बसणे, तोंडात नारळ धरून मान्यवरांचा सत्कार करणे, नमस्कार करणे, पाटावर, बाजेवर, परातीत उभे राहून वाद्यांच्या तालावर थिरकणे अशा अनेक प्रकारांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. मालकासोबत बुलेटवर स्वार झालेला अश्व यंदाच्या प्रदर्शनाचे आकर्षण ठरला. प्रदर्शनात अश्वांना मारण्यास बंदी आहे. गत चार वर्षापासून होणारे हे प्रदर्शन राज्यभरातील अश्वशौकिनांसाठी पर्वणीच ठरते आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या अश्वपालकांना लाखो रूपयांच्या बक्षिसांनी गौरविण्यात आले.

Web Title: SANGAMNER DEVGAD YATRA HORSE SHOW

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.