संगमनेर तालुक्यात बिबट्याचा चौंघावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 08:05 PM2019-02-26T20:05:39+5:302019-02-26T20:05:47+5:30

संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथे बिबट्याने सोमवारी सायंकाळी एका पाठोपाठ केलेल्या चार जणांवर हल्ला केला.

In the Sangamner taluka, a leopard attacked the beach | संगमनेर तालुक्यात बिबट्याचा चौंघावर हल्ला

संगमनेर तालुक्यात बिबट्याचा चौंघावर हल्ला

आश्वी : संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथे बिबट्याने सोमवारी सायंकाळी एका पाठोपाठ केलेल्या चार जणांवर हल्ला केला. हल्ल्यामध्ये दीपक वसंत सोनवणे, सपना बाळासाहेब वाघमारे, वेणुनाथ सुखदेव सारबंदे व आणखी एक जण जखमी झाला. वेणुनाथ सारबंदे हे दुस-यादा बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले.

उंबरी-बाळापूर येथील स्वामी समर्थ केंद्रालगत राहत असलेल्या दिलीप भाऊसाहेब उंबरकर यांच्या वस्तीच्या समोरील रस्त्यावरुन प्रवास करणा-या बेसावध नागरीकांवर बिबट्यााने सोमवारी रात्री हल्ला केला होता. यामध्ये सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास आश्वी खुर्द येथिल दीपक सोनवणे हे आपला मित्र दीपक दातीर, सपना वाघमारे व अन्य एक जन हे दुचाकीवरुन थोड्या वेळाच्या अतंराने येत होते. यावेळी शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये सुदवैने ते बचावले आहेत. रात्री दहाच्या सुमारास वेणुनाथ सारबंदे हे निमगावजाळी येथून येत असताना पाटालगत त्यांच्यावर बिबट्याने हल्ला करत त्याच्या दुचाकीचे नुकसान केले. तर मागील वर्षी सारबंदे हे बिबट्याच्या हल्यातून बचावले होते.

Web Title: In the Sangamner taluka, a leopard attacked the beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.