संगमनेरात प्रशासन पुन्हा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:57 AM2021-02-20T04:57:22+5:302021-02-20T04:57:22+5:30

प्रांतकचेरीपासून शहरातील मुख्य चौकांमध्ये जात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना सूचित केले. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. ...

Sangamnerat administration on the road again | संगमनेरात प्रशासन पुन्हा रस्त्यावर

संगमनेरात प्रशासन पुन्हा रस्त्यावर

प्रांतकचेरीपासून शहरातील मुख्य चौकांमध्ये जात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना सूचित केले. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील आदी या फेरीत सहभागी झाले होते.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून प्रत्येकाने स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. घराबाहेर पडताना तोंडाला मास्क, रूमाल बांधावा, शारीरिक अंतर ठेवावे, दुकानांमध्ये जास्त गर्दी करू नये अथवा होवू देवू नये, खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यास सांगावे अन्यथा ग्राहकांबरोबरच दुकानदारांवर देखील कारवाई करण्यात येईल, असे आवाहन ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात आले.

-----------

तोंडाला मास्क अथवा रूमाल न बांधता घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलीस दंडात्मक कारवाई करत आहेत. पोलिसांचे विशेष भरारी पथक नेमण्यात आले असून कठोर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

रात्रीची संचारबंदी कायम आहे. कोरोनाचे घालून दिलेले नियम न पाळल्यास प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावेच लागेल.

-मुकुंद देशमुख, पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर पोलीस ठाणे, संगमनेर

Web Title: Sangamnerat administration on the road again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.