‘महा कृषी ऊर्जा’च्या शासकीय जाहिरातीत संगमनेरचा कलाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:15 AM2021-03-29T04:15:29+5:302021-03-29T04:15:29+5:30
बाळासाहेब ढमाले हे संगमनेर शहरानजीक असलेल्या घुलेवाडीतील रहिवासी असून, ते उच्चशिक्षित व अल्पभूधारक शेतकरी आहेत. अभिनय व गायनाची विशेष ...
बाळासाहेब ढमाले हे संगमनेर शहरानजीक असलेल्या घुलेवाडीतील रहिवासी असून, ते उच्चशिक्षित व अल्पभूधारक शेतकरी आहेत. अभिनय व गायनाची विशेष आवड असलेल्या ढमाले यांना एका शासकीय जाहिरातीत काम मिळण्यासाठी त्यांचे परिचित सतीश आव्हाड यांनी ऑडिशनसाठी त्यांना मुंबईला बोलावले. ऑडिशन पूर्ण झाल्यानंतर अभिनेते अनासपुरे यांच्यासोबत शासकीय जाहिरातीत काम करण्याची संधी ढमाले यांना मिळाली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोडी गावात या जाहिरातीचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. सध्या ही जाहिरात टीव्हीवर दाखविण्यात येत आहे.
महा कृषी ऊर्जा अभियानाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना साैर कृषिपंप देण्याचे शासनाने धोरण आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावे, असे आवाहन कलाकार ढमाले यांनी केले आहे. रविवारी (दि. २८) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. शिरीष नागरे यांनी त्यांचा सत्कार केला. त्यांच्या अभिनयाचे कौतुकही त्यांनी केले. महसूलंत्री थोरात यांचे जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ, भाऊसाहेब सातपुते, नानासाहेब मालुंजकर, डॉ. बाळासाहेब सातपुते, विशाल काळे, धनंजय शिरसाठ, निकेतन ढमाले आदी यावेळी उपस्थित होते.