नगरमध्ये संघ दक्ष, भाजपचे मात्र दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 11:29 AM2020-05-21T11:29:45+5:302020-05-21T11:29:54+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या महामारीमध्ये अहमदनगर शहरात अनेकांना समस्या भेडसावत आहेत. महापालिका भाजपाच्या ताब्यात असुनही महापालिका प्रशासन आणि शहर भाजप मात्र जनसेवेकडे दुर्लक्षच करीत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र दक्षता बाळगून आम्हीही नगरकरांची सेवा करण्याची इच्छा महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे व्यक्त केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी मदत कार्य करण्याची भूमिका घेत महापालिका आयुक्तांना काम करण्यास परवानगी देण्याची मागणी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत केली. विशेष म्हणजे या बैठकीला महापौर बाबासाहेब वाकळे हेही उपस्थित होते. संघाकडून अशी मदत कार्याची भूमिका घेतली जात असताना भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील नेते मात्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पक्षाने दिलेला कार्यक्रम जिल्ह्यात राबवून त्यांनी विविध उपाययोजनांबाबत जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच भाजपने उद्या काळे झेंडे घेऊन महाराष्ट्र बचाव आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनातही जिल्ह्यातील भाजपचे नेते सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मदत कार्यासाठी पुढे येत असताना भाजप मात्र आंदोलनाच्या भूमिकेत आहे. संघ आणि भाजप अशी एक वेगळी भूमिका घेतली जात आहे.
महापालिकेत भाजपचीच सत्ता आहे. असे असताना महापालिका प्रशासनाकडून शहरात जनतेची सेवा करण्याची मोठी संधी असताना ही दवडली गेली आहे. जनसेवा करण्याऐवजी महापौर-उपमहापौर यांच्यात विकास कामांवरून वाद सुरू आहेत. भाजपचे शहरातील कार्यकर्तेही काम करण्यास फारसे उत्सुक दिसत नाहीत. त्यामुळे शहरात काम करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच पुढाकार घेऊन काम करण्याची इच्छा प्रकट केली. ही भाजपसाठी गांधीगिरी तर नाही ना?अशी चर्चा आता शहरात रंगत आहे.