सावेडी उपनगरात अत्याधुनिक रुग्णालय उभारणार-संग्राम जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 05:46 PM2019-10-18T17:46:44+5:302019-10-18T17:47:23+5:30
अहमदनगर: सावेडी उपनगरात नव्याने अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय पुढील पाच वर्षांत उभारण्याचा प्रयत्न असून, नवीन खत प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले़. त्यामुळे सावेडी उपनगरातील कचरा डेपो बंद होईल़. तपोवन रस्त्याचे काम मार्गी लावले असून, तो लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे़.

प्रभाग क्रमांक १ मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महापालिकेतील गटनेते संपत बारस्कर, नगरसेविका दीपाली बारस्कर, मिनाताई चव्हाण, नगरसेवक सागर बोरूडे, बाळासाहेब बारस्कर, शिवाजी चव्हाण,नगरसेवक कुमार वाकळे, विनित पाऊलबुधे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्र्यंबके, राजेंद्र तागड, स्वप्निल ढवण, सतीश ढवण, शहरजिल्हाध्यक्ष माणिक विधाते, दगडू पवार, संजय बुधवंत, शिवाजी साळवे, अरूण मतकर आदींसह नागरिक उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले, सावेडी उपनगरात जलतरण तलाव निर्माण केला जाणार आहे़. लक्ष्मीनगर परिसरात एक किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक निर्माण केला़. तपोवन रस्ता परिसरात उद्यानाची निर्मिती करणार आहे. विकासाचा संकल्प हाच ध्यास घेऊन शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहे. पुढील पाच वर्षामध्ये अधिक जोमाने काम करून नगर शहराची वाटचाल महानगराकडे करणार आहे. शहराचा सर्वांगीण विकास हाच आपला अजेंडा असल्याचे जगताप म्हणाले़. यावेळी नगरसेवक बारस्कर म्हणाले, जगताप यांच्या नेतृत्वाखाली मागील पाच वर्षामध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे नगरसेवक प्रभागामध्ये मोठ्याप्रमाणात विकासकामे करू शकलो. सर्वात महत्वाचा प्रश्न तपोवन रस्त्याचे काम मार्गी लावले़. या कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लावला.