संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय देशात पंचविसाव्या स्थानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:18 AM2021-01-21T04:18:50+5:302021-01-21T04:18:50+5:30
कोपरगाव : संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय ग्रामीण भागात आहे. त्याचे दक्षिण आशियामधील एका मोठ्या मीडिया ग्रुपतर्फे प्रकाशित होणाऱ्या डेटाक्वेस्ट या ...
कोपरगाव : संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय ग्रामीण भागात आहे. त्याचे दक्षिण आशियामधील एका मोठ्या मीडिया ग्रुपतर्फे प्रकाशित होणाऱ्या डेटाक्वेस्ट या मासिकाद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार संजीवनी हे गुणवत्ता व दर्जाच्या बाबतीत देशात २५व्या स्थानावर आले आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या शीरपेचात अधिकचा एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोल्हे म्हणाले, महाविद्यालय पश्चिम विभागात व राज्यातही चौथ्या स्थानावर असल्याचे जाहीर करून या त्रयस्त माध्यमाने केलेल्या सर्वेक्षणामुळे अगोदरच अनेक किर्तीमान स्थापित केले आहे. मागील १५ वर्षांपासून डेटाक्वेस्टमार्फत देशातील एनआयटी, आयआयटीसह सरकारी व खासगी सहभागी अभियांत्रिकी महाविद्यालयांचा पहिल्या १०० संस्थांचा क्रम ठरविला जातो. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) अखत्यारीत देशात सुमारे ४ हजार अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. त्यात संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयास ‘१०० टेक इनॅबल्ड’ या बिरूदावलीने घोषित करण्यात आलेे आहे. यावेळेस डेटाक्वेस्ट या मासिकाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दूरभाष्य प्रणाली शिक्षणाच्या पध्दतींवर भर देऊन पायाभूत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्ये विकास, उदयोन्मुख तंत्रज्ञान, आधुनिक संसाधनांचा उपयोग, डिजीटल परिवर्तन, दूरभाष्य प्रणालीमार्फत प्रभावी शिक्षण, इंटरनेट नेटवर्क नसलेल्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शिक्षण पोहोचविण्यात आलेल्या अडचणींवर मात करून केलेले प्रयत्न इत्यादी बाबींचे निकष लावले होते. महाराष्ट्रात सुमारे ३३४ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यात पहिल्या १००मध्ये फक्त ११ महाविद्यालयांचा समावेश आहे. त्यात संजीवनी चौथ्या स्थानावर असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.
............
फोटो२०- अमित कोल्हे