संजीवनी पाॅलिटेक्निक ‘क्लिन अँड स्मार्ट कॅम्पस’ पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:26 AM2021-09-17T04:26:15+5:302021-09-17T04:26:15+5:30
कोपरगाव : भारत सरकारच्या अखत्यारीतील आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई), नवी दिल्लीने राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी ...
कोपरगाव : भारत सरकारच्या अखत्यारीतील आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई), नवी दिल्लीने राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी आयोजित ‘क्लिन अँड स्मार्ट कॅम्पस’ स्पर्धेत संजीवनी के. बी. पी. पाॅलिटेक्निकने देशात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळविला आहे. पुरस्कार प्राप्त करणारी महाराष्ट्रातील संजीवनी ही एकमेव संस्था आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.
हा पुरस्कार भारताचे शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकतामंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे हस्ते नवी दिल्ली येथील एआयसीटीईच्या सभागृहात शानदार सोहळ्यात संजीवनी पाॅलिटेक्निकचे प्राचार्य ए. आर. मिरीकर व प्रा. योगेश पवार यांनी स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डाॅ. राजकुमार रंजन सिंग, मानव संसाधन व विकास मंत्रालयाचे सचिव अमित खरे, एआयसीटीईचे अध्यक्ष डाॅ. अनिल सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डाॅ. एम.पी. पुणिया, मेंबर सेक्रेटरी डाॅ. राजीव कुमार उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले, एआयसीटीईच्या वतीने ही स्पर्धा घेतली जाते. स्वच्छता आणि पर्यावरणपूरक जागृतीच्या दिशेने प्रत्येक संस्थेच्या कॅम्पसची वाटचाल व्हावी, वाढत्या तंत्रज्ञानाचा वापर स्मार्ट कॅम्पस बनविण्याच्या दृष्टीने आणि त्या संस्थेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वच्छ व स्मार्ट भारत घडविण्याच्या दृष्टीने प्रेरित व्हावे, असा या स्पर्धेचा हेतू आहे. संजीवनी नी पाॅलिटेक्निकचे प्राचार्य मिरीकर, प्रा. योगेश पवार, प्रा. वैभव परजणे यांनी व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली विविध बाबींचे सादरीकरण ऑनलाइन पद्धतीने एआयसीटीईला दिले. सादरीकरण करणाऱ्या टीमला विजय नायडू, डॉ. आर. ए. कापगते, प्रा. विपुल पटेल व प्रा. नागोराव सुरणार यांचेही सहकार्य लाभले.
माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी संजीवनी पाॅलिटेक्निकला मिळालेल्या पुरस्काराबद्दल कौतुक केले.
.....................
फोटो ओळी:
एआयसीटीई, नवी दिल्ली आयोजित क्लिन अँड स्मार्ट कॅम्पस अवाॅर्ड स्पर्धेत संजीवनी पाॅलिटेक्निकचा नवी दिल्ली येथे पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य ए. आर. मिरीकर व प्रा. योगेश पवार.
...........
फोटो१६ - संजीवनी पुरस्कार - कोपरगाव
160921\skbpp-award 15.9.21.jpg
फोटो१६ - संजीवनी पुरस्कार - कोपरगाव