कोपरगावच्या संजीवनीची सोलर कार देशात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 08:34 PM2018-04-15T20:34:58+5:302018-04-15T20:35:34+5:30

भारतातील सौर क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कंपनीने महर्षी मार्कंडेश्वर विद्यापीठ (मुलाना, अंबाला) येथे आयोजित केलेल्या इंडियन सोलर व्हेईकल चॅम्पियनशिप स्पर्धेत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सोलर कारने सर्व कसोट्या पूर्ण करुन राष्ट्रीय स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

Sanjivani's solar car in Kopargaon is the first in the country | कोपरगावच्या संजीवनीची सोलर कार देशात प्रथम

कोपरगावच्या संजीवनीची सोलर कार देशात प्रथम

कोपरगाव : भारतातील सौर क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कंपनीने महर्षी मार्कंडेश्वर विद्यापीठ (मुलाना, अंबाला) येथे आयोजित केलेल्या इंडियन सोलर व्हेईकल चॅम्पियनशिप स्पर्धेत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सोलर कारने सर्व कसोट्या पूर्ण करुन राष्ट्रीय स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
नाविण्यपूर्ण प्रकल्पांमध्ये संजीवनी देश पातळीवर अग्रेसर असून १.१० लाख रुपयांचे बक्षिस पटकावले आहे. सोलर कार डिझाईन ते स्पर्धा दरम्यान ज्ञानेश संजय सोनवणे, राहुल राजेंद्र सोनवणे यांनी अनुक्रमे कॅप्टन व व्हाईस कॅप्टन म्हणून काम पाहिले. नूतन हुरूळे स्टेअरिंग, विनया जोशी प्रेझेंटेशन, बारबुध्दे ट्रान्समिशन, भूषण टापरे याने ब्रकिंग, चांगदेव वाळूंज रोल केज, शुभम आहेर इलेक्ट्रिकल, आकिब मनियार याने कंट्रोलर अ‍ॅण्ड सोलर यांनी प्रकल्प प्रमुख म्हणून तर अमेय निखारे व जितेंद्र ढवळे यांनी काम पाहिले. या प्रकल्पात एकूण ३९ विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

 

 

Web Title: Sanjivani's solar car in Kopargaon is the first in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.