संत निळोबाराय महाराजांच्या पालखीचे मंगळवारी एस.टी. बसने होणार प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 04:45 PM2020-06-28T16:45:38+5:302020-06-28T16:47:40+5:30

नगर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणा-या पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय महाराजांच्या पादुकांचे एस.टी. बसने ३० जून रोजी प्रस्थान होणार आहे. 

Sant Nilobarai Maharaj's palanquin will leave for ST on Tuesday | संत निळोबाराय महाराजांच्या पालखीचे मंगळवारी एस.टी. बसने होणार प्रस्थान

संत निळोबाराय महाराजांच्या पालखीचे मंगळवारी एस.टी. बसने होणार प्रस्थान

पारनेर : नगर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणा-या पारनेर तालुक्यातील  श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय महाराजांच्या पादुकांचे एस.टी. बसने ३० जून रोजी प्रस्थान होणार आहे. 

मंगळवारी सकाळी ८ वाजता निळोबाराय महाराज मंदिराच्या प्रांगणातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, आमदार निलेश लंके यांच्या हस्ते निळोबाराय महाराजांच्या समाधीचे व पादुकांचे पूजन करण्यात येणार आहे. यानंतर पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. 

एस.टी. बसने पालखी सोबत २० जण जाणार आहेत. या सर्वांची कोरोना टेस्ट करून घेतली जाणार आहे. त्यांनतरच त्यांना प्रवेश मिळणार आहे. पालखी सोहळ्याबरोबर एक पोलीस अधिकारी, वाहन व्यवस्था राहणार आहे. ३० जून रात्री अकरा वाजेपर्यत पंढरपूरमध्ये पोहोचणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Web Title: Sant Nilobarai Maharaj's palanquin will leave for ST on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.