सारोळा, आपटी भाजपकडे, तर खुरदैठनवर राष्ट्रवादीचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:21 AM2020-12-31T04:21:38+5:302020-12-31T04:21:38+5:30
जामखेड : तालुक्यातील सारोळा व आपटी या दोन ग्रामपंचायतींसाठी जागेच्या प्रमाणातच उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायती बिनविरोध ...
जामखेड : तालुक्यातील सारोळा व आपटी या दोन ग्रामपंचायतींसाठी जागेच्या प्रमाणातच उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायती बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व कायम राहिले. आपटी ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची ही सहावी वेळ असून, सारोळा ग्रामपंचायत दुसऱ्यांदा बिनविरोध झाली. खुरदैठन ग्रामपंचायत प्रथमच बिनविरोध होऊन ती राष्ट्रवादीकडे गेली आहे.
सारोळा ग्रामपंचायतसाठी सायंकाळी ४ वाजता विद्यमान सरपंच व भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद व युवराज वस्ताद काशीद यांच्या नेतृत्वाखाली नऊ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश वराट, सहायक निवडणूक अधिकारी पी. जे. जाधव यांच्याकडे सादर केले. बिनविरोध निवड झालेले सदस्य पुढीलप्रमाणे : हर्षद बंडू मुळे, अनिता राजेंद्र मासाळ, मनीषा बापूराव तांबे, रितू अजय काशीद, संतोष मुरलीधर खवळे, शहाजी सोन्याबापू पवार, चैताली शंकर जगदाळे, किरण मुरलीधर मुळे, संगीता दादाहरी बहीर.
आपटी ग्रामपंचायतसाठी विद्यमान व भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरपंच नंदू गोरे यांच्या नेतृत्वाखाली सात उमेदवारांनी सायंकाळी पाचच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. बिनविरोध निवड झालेले सदस्य : संध्या नंदकुमार गोरे, प्रवीण आश्रू खवळे, मुक्ताबाई रमेश ढगे, सुदाम शहाजी राऊत, छाया संजय भांडवलकर, पंडित सोनबा गोरे, अनिता शिवाजी गोरे. बिनविरोध निवडीसाठी सरपंच नंदू सोनबा गोरे, सुभाष गोरे, दादासाहेब गोरे, कृष्णा खवळे, तेजराव गोरे, नारायण खुपसे यांनी विशेष परिश्रम घेतले.
खुरदैठन ग्रामपंचायतच्या सात उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी एम. एस. साळवे यांच्याकडे अर्ज दाखल केले. येथे बिनविरोधसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पुढाकार घेतला. अश्विनी रमेश ठाकरे, निर्मला गोकुळ डुचे, दादा शहाजी डुचे, मंदाबाई विठ्ठल डुचे, मनीषा अविनाश ठाकरे, हनुमान कुंडलिक देवकाते, सुनीता मोहन डुचे.
(फोटो ३० जामखेड ग्रामपंचायत)
सारोळा, आपटी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर जामखेड येथील तहसील कार्यालयासमोर युवराज वस्ताद काशीद, सारोळाचे सरपंच अजय काशीद व आपटीचे सरपंच नंदकुमार गोरे व इतर सदस्य एकत्र आले हाेते.