चित्रा वराळ निघोजच्या सरपंच, ज्ञानेश्वर वरखडे उपसरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:19 AM2021-02-12T04:19:27+5:302021-02-12T04:19:27+5:30
निघोज : पारनेर तालुक्यातील निघोजच्या सरपंचपदी संदीप पाटील फाउंडेशनच्या चित्रा वराळ, तर उपसरपंचपदी ज्ञानेश्वर वरखडे यांची निवड झाली. सतरा ...
निघोज : पारनेर तालुक्यातील निघोजच्या सरपंचपदी संदीप पाटील फाउंडेशनच्या चित्रा वराळ, तर उपसरपंचपदी ज्ञानेश्वर वरखडे यांची निवड झाली.
सतरा सदस्य असलेल्या निघोज ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास पॅनेलला चार जागा, युवा नेते सचिन पाटील वराळ यांच्या पॅनेलला आठ जागा, मोरवाडी रसाळवाडी अपक्ष तीन जागा, तिसरी आघाडीला दोन जागा असे बलाबल होते. त्यातील गणेश कवाद व दिगंबर लाळगे यांचे खेडमधून अपहरण झाल्याची फिर्याद देण्यात आली होती. हे दोन सदस्य गैरहजर होते. वराळ गटाचे सचिन वराळ, चित्रा वराळ, ज्ञानेश्वर वरखडे, मंगेश वराळ, रूपाली गायखे, मनीषा घोगरे, शबनूर इनामदार, जया वराळ हे आठ सदस्य मतदानाला उपस्थित होते, तर विरोधी गटाचे सुधामती कवाद, शंकर गुंड, भरत रसाळ, अविता वरखडे, भावना साळवे, ज्योती पांढरकर, योगेश वाव्हळ हे सात सदस्य होते.
प्रत्यक्ष निवडणुकीवेळी सरपंचपदासाठी चित्रा वराळ व उपसरपंचपदासाठी ज्ञानेश्वर वरखडे यांना नऊ, तर सुधामती कवाद व शंकर गुंड यांना सहा मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संभाजी झावरे यांनी काम पाहिले.
----
२०१५ ची पुनरावृत्ती..
निघोज ग्रामपंचायत निवडणुकीत २०१५ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती झाली. त्यावेळीही पराभूत पॅनेलचे एक मत फुटले होते. त्याचीच पुनरावृत्ती २०२१ मध्येही झाली. त्यामुळे तालुक्यात हा विषय चर्चेचा ठरला. एका मताच्या फुटीबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.
फोटो ११ चित्रा वराळ, ११ ज्ञानेश्वर वरखडे