नगर तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीत जनतेतून होणार सरपंच

By Admin | Published: July 4, 2017 03:07 PM2017-07-04T15:07:19+5:302017-07-04T15:07:19+5:30

नगर तालुक्यातील तब्बल ३१ ग्रामपंचायतींची मुदत संपत आल्याने लवकरच त्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

Sarpanch will get 31 gram panchayats in Nagar taluka | नगर तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीत जनतेतून होणार सरपंच

नगर तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीत जनतेतून होणार सरपंच

नगर तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीत जनतेतून होणार सरपंच

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : नगर तालुक्यातील तब्बल ३१ ग्रामपंचायतींची मुदत संपत आल्याने लवकरच त्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली असून दोन टप्प्यात निवडणुकीचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने याचा पहिला प्रयोग यावर्षी नगर तालुक्यातील पाहावयास मिळणार आहे.
नगर तालुक्यातील सुमारे ३१ ग्रामपंचायतींची मुदत यावर्षी संपत आहे. ज्या गावांच्या मुदत संपत आहेत त्या गावच्या नावांची यादी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवली आहे. त्यांनी पुढील प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडे या गावांची नावे पाठवली आहेत. दोन टप्प्यात या निवडणुका होण्याची दाट शक्यता असल्याने सप्टेंबर-आॅक्टोबर मध्ये पहिला टप्पा तर नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये दुस-या टप्प्यातील गावांच्या निवडणुका होतील.
तालुक्यातील आगडगाव,आठवड, बाबुर्डी बेंद, बारदरी, जखणगाव, कापूरवाडी, खातगाव, कौडगाव, मदडगाव, नागरदेवळे, नांदगाव, नारायणडोहो, नेप्ती, पांगरमल, पिंपळगाव कौडा, पिंपळगाव उज्जेनी, पिंपळगाव लांडगा, राळेगण, रांजणी, रतडगाव, साकत, सारोळा बद्धी, सारोळा कासार, ससेवाडी, शेंडी, सोनेवाडी पिला, सोनेवाडी चास, टाकळी खातगाव, उक्कडगाव, वडगाव तांदळी, वाळकी या गावामध्ये थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे.
.....
 

Web Title: Sarpanch will get 31 gram panchayats in Nagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.