दुसऱ्या डोससाठी होतेय ससेहोलपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:20 AM2021-05-13T04:20:27+5:302021-05-13T04:20:27+5:30
राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्र असल्याने वाकडी, शिर्डी, जळगाव, चितळी, तर औरंगाबाद जिल्ह्यातील डोणगाव, लाखगंगा, ...
राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्र असल्याने वाकडी, शिर्डी, जळगाव, चितळी, तर औरंगाबाद जिल्ह्यातील डोणगाव, लाखगंगा, बाबतरा आणि श्रीरामपूर तालुक्यातील मातुळठाण, नाउर, नायगाव या गावांना पुणतांबा ग्रामीण रुग्णालय जवळचे आरोग्य केंद्र असल्याने ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये पुणतांबाला प्राधान्य नागरिकांकडून दिले जात आहे.
पुणतांबा ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढण्याच्या भीतीने गावातील लोकांना प्राधान्यक्रम देण्यात यावा, असा सूर गावातील काही मंडळींनी काढताच, टोकन पद्धत अवलंबण्याची सूचना ग्राह्य धरून टोकनसाठी रांगा लागण्यास सुरुवात झाली. यात गावातील काही स्वयंघोषित पुढारी, आरोग्य कर्मचारी आपल्या हितचिंतकांचा आधी नंबर लावून मोकळे होत असल्याने, टोकन व ऑनलाईन पद्धत फक्त दिखाव्यासाठी आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
नोंदणी फुल्ल होऊनही लसीचे १०० ते १५० डोसच येत असल्याने पहिला डोस द्यावा की दुसरा डोस, अशी संभ्रमावस्था व्हेरिफिकेशन करणाऱ्यांची होत आहे.
.............
जिल्हा रुग्णालयातून आम्हाला सरासरी डोस मिळत असल्याने व गावातील लोकांना प्रथमप्राधान्य देण्यात येण्यासाठी टोकन पद्धत अवलंबली असली तरी, लोक पहाटेपासून रुग्णालयासमोर रांगा लावतात.
- डॉ. कुंदन गायकवाड,
वैद्यकीय अधिकारी, पुणतांबा ग्रामीण रुग्णालय
............
कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन दोन महिने झाले. दुसऱ्या डोससाठी रात्री बारा वाजेपासून नंबर लावला असता, अठरावा नंबर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले
- बी. एन. सिंग, रेल्वे कर्मचारी
....................