शरयू साखर कारखाना फसवणूक प्रकरणी भाजपा नेत्याला सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात
By अण्णा नवथर | Published: July 27, 2023 11:56 AM2023-07-27T11:56:05+5:302023-07-27T11:56:22+5:30
भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांना सातारा पोलिसांनी घेतले चौकशीसाठी ताब्यात
अहमदनगर :सातारा येथील शरयू कारखान्यानेची फसवणूक केल्याच्या आरोपावरून भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांना सातारा पोलिसांनी गुरुवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांची सातारा येथील पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांनी दिली.
भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी बनावट कागदपत्रे देऊन कारखान्याचा कारखान्याची फसवणूक केल्याची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापकाने दाखल केलेली आहे. याबाबत चौकशी करण्यासाठी लोढा यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सातारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर काही दिवसापूर्वी चौकशी करण्यासाठी पोलीस नगर मध्ये आले होते व त्यांनी लोढा यांची चौकशीही केली होती त्यानंतर गुरुवारी पहाटे लोढा यांना त्यांच्या दुरगाव येथील नातेवाईकांच्या घरात घरून पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.