तनपुरे कारखाना कामगारांना पगार मिळाल्याने समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:22 AM2021-09-11T04:22:45+5:302021-09-11T04:22:45+5:30
थकीत पगारासाठी तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी १४ दिवस आंदोलन केले. गणेश स्थापनादिनाच्या मुहुर्तावर विखे यांनी समक्ष उपस्थित राहुन पगार वाटप ...
थकीत पगारासाठी तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी १४ दिवस आंदोलन केले. गणेश स्थापनादिनाच्या मुहुर्तावर विखे यांनी समक्ष उपस्थित राहुन पगार वाटप सुरु केले. कामगारांना एक पगार मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला. यावेळी कामगारांनी विखे यांची समक्ष भेट घेवून आभार व्यक्त केले. कामगार थकीत पगारप्रश्नी आंदोलन करून आमच्या मागणीसाठी आम्ही सर्व कामगारांनी आंदोलनाद्वारे लढा दिला. व्यवस्थापनाने लेखी आश्वासनाप्रमाणे आज १ पगार दिल्याने कारखाना व्यवस्थापनाचे आभार व्यक्त करण्यात आले. कारखाना कामगार सकारात्मक राहून कारखान्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतील, अशी प्रतिक्रिया कामगार नेते इंद्रभान पेरणे यांनी दिली. उपस्थित असलेल्या सर्व कामगारांना पगार मिळाल्यानंतर आंदोलनातील कामगार इंद्रभान पेरणे, सीताराम नालकर, राजू सांगळे, बाळासाहेब तारडे, नामदेव शिंदे, सुरेश तनपुरे यांनी पगार घेतला आहे.