सत्संगामुळे मनाला स्थिरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 10:00 AM2019-09-11T10:00:13+5:302019-09-11T10:03:01+5:30

सत्संगामुळे मन हलके व स्थिर होते म्हणून सत्संगाला महत्व आहे. ज्यावेळी तुमचे मन अस्थिर झालेले असेल. अशावेळी धर्मस्थानात जावे. संत संगतीचा, त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा. सत्संगात भाग घ्यावा. मनाला स्थिरता लाभेल आणि नंतर तुम्हाला तुमच्या समस्या सोडविण्याचा मार्ग सापडू शकेल.

Satsang gives stability to the mind | सत्संगामुळे मनाला स्थिरता

सत्संगामुळे मनाला स्थिरता

सन्मतीवाणी

सांसारिक जीवनात अनेक संकटे, समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येते. अशावेळी मन स्थिर व शांत ठेवण्याची गरज असते. मनावर एक प्रकारे समस्यांचा दबाव असतो. तो कमी करण्यासाठी सत्संगाची आवश्यकता असते. सत्संगामुळे मन हलके व स्थिर होते म्हणून सत्संगाला महत्व आहे. ज्यावेळी तुमचे मन अस्थिर झालेले असेल. अशावेळी धर्मस्थानात जावे. संत संगतीचा, त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा. सत्संगात भाग घ्यावा. मनाला स्थिरता लाभेल आणि नंतर तुम्हाला तुमच्या समस्या सोडविण्याचा मार्ग सापडू शकेल. आजकाल कुणावर विश्वास ठेवणे धोकेदायक आहे. कोण कधी धोका देईल हे सांगता येत नाही. अशावेळी आपण सावधगिरीने वागण्याची गरज आहे.
राजकारणात कूटनीती असते. एकमेकाविरुध्द लढावे लागते. राजकारणातील नीती घरात प्रपंचात आणू नये. तशी कूटनीती संसारात आली तर घराची बरबादी होईल. सदगुरुंवर श्रध्दा व भक्तिभाव ठेवला तर मनाला स्थिरता लाभते. संकट दूर होण्यास मदत होते. पृथ्वीला पर्वत आणि सागराचा भार कधीही होत नाही. पृथ्वी आनंदाने हा भार सहन करते. घरातील गोपनीय गोष्टी जाहीरपणे उघड करु नका. सदगुरुंचे उपकार लक्षात ठेवा नाहीतर विश्वासघात होईल. महावीरांच्या जीवनगाथा ऐका. यामुळे जीवनात आत्मप्रकाशाची ज्योत प्रगट होते. तपश्चर्येचा मुखवटा लावू नका, श्रध्दापूर्वक तपसाधना करा. तपसाधनेशिवाय आत्मिक ज्ञानाची प्राप्ती होणार नाही.
जीवनात जो चुका वारंवार करतो, त्या कबूल करत नाही. त्या माणसाला अहंमपणाची भावना येते. तो ताठर होतो.  तो ताठरपणा जीवनाचा घात करु शकतो. ताठरपणा सोडून नम्रतेने वागले पाहिजे. तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो. दुसºयांना रागावू नका, दुसºयांवर आपला राग दाखवू नका. रागामुळे चांगली कामे बिघडतात. दुसºयांच्या मनाला लागतील असे विषारी शब्द बोलू नका. रागावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करा. 
    - पू. श्री. सन्मती महाराज

Web Title: Satsang gives stability to the mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.