आरक्षण मिळाल्यानं मराठा महासंघाच्या वतीने शनीदेवास अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 05:05 PM2019-06-28T17:05:41+5:302019-06-28T17:05:48+5:30
मराठा समाजाला न्यायालयात आरक्षण मिळाल्याबद्दल मराठा महासंघाच्या वतीने आज शनी देवास अभिषेक करत लाडू व पेढ्याचे वाटप करत जल्लोष करण्यात आले.
सोनई : मराठा समाजाला न्यायालयात आरक्षण मिळाल्याबद्दल मराठा महासंघाच्या वतीने आज शनी देवास अभिषेक करत लाडू व पेढ्याचे वाटप करत जल्लोष करण्यात आले.
यावेळी मराठा महासंघाचे राज्य अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे व युवक मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संतोष नानावटे यांच्या शुभहस्ते अभिषेक केला. आश्वासन पूर्ती करत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देण्यात आले.
15 नोव्हेंबर 2018 रोजी झालेल्या शनी शिंगणापूर येथे झालेल्या शेतकरी-वारकरी महासंमेलनात मुख्यमंत्र्यांनी ‘आंदोलन कशाला करता आता जल्लोषच साजरा करा,’ असे म्हणत शनीदेवाच्या दरबारीच मराठा आरक्षणाची घोषणाच केली होती.
शेतकरी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी शनी शिंगणापूर येथे येऊन शनिदेवास विधिवत अभिषेक केला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेकांनी बलिदान दिले. गेल्या वीस वषार्पासून स्व.आण्णासाहेब पाटील यांच्यासारख्या अनेकांनी आरक्षणाची मागणी केली होती. परंतु कोपर्डीच्या घटने नंतर सर्व समाज एकत्र येऊन लढा दिला. आरक्षणाचे श्रेय हे एकद्या कुणाचे नसून सर्व सामाजाचे असल्याचे संभाजी दहातोंडे यांनी सांगितले.
यावेळी मराठा महासंघाचे युवक प्रदेश अध्यक्ष संतोष नानवटे, जिल्हाध्यक्ष राज गवांदे, युवक मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओम काळे, पोलीस पाटील सायराम बानकर, बिभीषण खोसे, भाऊसाहेब वाकचौरे, शाम पवार, अक्षय अभाळे, गंगाधर बोरुडे, ज्ञानेश्वर फसले, ईश्वर वाकचौरे, संतोष हंबर, बाबासाहेब भोंगे, डॉ. ज्ञानदेव कोरडे, दत्ता शिंदे, संतोष पागिरे, दिलीप थोरात, अजिनाथ मोरे, महेश लगड, वैभव ठाणगे, सुभाष पवार, पोपट दहातोंडे, सुभाष शिंदे, आबासाहेब लोखंडे, आबासाहेब दहातोंडे आदी पदाधिकारी हजर होते.