मुख्यमंत्र्यांना कोंडण्याचा तृप्ती देसार्इंचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2017 07:37 PM2017-04-19T19:37:24+5:302017-04-19T19:37:24+5:30
संपूर्ण राज्यात दारूबंदी होण्यात अडथळा निर्माण केल्यास मुख्यमंत्र्यांना कोंडू असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला.
आॅनलाइन लोकमत
राहुरी (अहमदनगर) दि़ १९- संपूर्ण राज्यात दारूबंदी होण्यात अडथळा निर्माण केल्यास मुख्यमंत्र्यांना कोंडू, पालकमंत्री राम शिंदेंसह सर्व मंत्र्यांना फिरणे मुश्किल करू, असा सज्जड इशारा भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी बुधवारी येथे दिला.
राहुरीत दारुबंदी रॅलीप्रसंगी आयोजित सभेत देसाई बोलत होत्या. संत गाडगे महाराज आश्रमशाळेतून दुचाकी व चार चाकी रॅलीस सुरूवात झाली़‘दारूबंदी झालीच पाहिजे’,‘कोण म्हणतं होणार नाही.’ अशा घोषणा देत रॅली तहसीलमध्ये पोहोचली. तेथे नायब तहसीलदार सुभाष कदम यांना दारूबंदीसंदर्भात निवेदन देण्यात आले़
मोर्चासमोर देसाई म्हणाल्या की, शनि शिंगणापूरमध्ये महिलांना चारशे वर्षे प्रवेश मिळणार नाही, असे म्हटले जात होते़ दारुबंदी होणार नाही, असे म्हणणाऱ्यांना राज्यात दारूबंदी क रण्यास भाग पाडू़ महिला, युवक एकत्र आल्याने राज्यभर दारूबंदी व्हावी अशी सरकारची इच्छा आहे़ दारूबंदीला सर्व स्वयंसेवी संघटनांचा पाठिंबा वाढत आहे.
प्रास्ताविक डॉ़विजय मक ासरे यांनी केले़ विक्रांत वाकचौरे,राजेंद्र बोरकर,भाऊसाहेब येवले,ललित चोरडिया,मधुकर म्हसे,रजनी कांबळे,अॅड़सतीश खर्डे,गणेश खैरे यांची भाषणे झाली़ याप्रसंगी डॉ़स्वप्निल माने,राकेश भोकरे,डॉग़ोरख चोथे,लुईजा आढाव, रेखा थोरात, ऋषिकेश येवले,कल्पना फर्नाडिस,निर्मला ओहोळ आदी उपस्थित होते.
मंत्र्यांच्या तोंडास काळे फासू़़.
लोकप्रतिनिधी व मंत्र्यांनी दारूचे समर्थन न करता पाठिंबा द्यावा, अन्यथा मंत्र्यांच्या तोंडास काळे फासू़ पालकमंत्री राम शिंदे हे दारूबंदीसंदर्भात गप्प का?असा सवालही देसाई यांनी केला़