सावेडी कचरा डेपोला आग : घनकचरा व्यवस्थापक एन.एस.पैठणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 02:59 PM2019-06-05T14:59:21+5:302019-06-05T15:00:15+5:30
सावेडी कचरा डेपोला लागलेल्या आगीचा झटका घनकचरा व्यवस्थापन प्रमुख तथा आरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांना बसला आहे.
अहमदनगर : सावेडी कचरा डेपोला लागलेल्या आगीचा झटका घनकचरा व्यवस्थापन प्रमुख तथा आरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांना बसला आहे.
जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहुल व्दिवेदी यांनी पैठणकर यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
महापालिकेच्या सावेडी कचरा डेपोला सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागली होती. महापालिकेचा शेंडी- पोखर्डी रस्त्यावर कचरा डेपो आहे़ शहरासह उपनगरांतील कचरा संकलन करून तो डेपो साठविला जातो़ साठविलेल्या कच?्यापासून खत बनविले जाते़ या ठिकाणी साठविलेल्या कचऱ्याच्या ढिगाºयाला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागली़ काही वेळात कचºयाच्या ढिगाºयाला आगीने वेढले़ वारा असल्याने आग भडकली होती. कच-यात प्लास्टिक असल्याने प्रशासनाला आग विझविण्यात यश आले नव्हते. या सर्व परिस्थितीला पैठणकर यांना जबाबदार धरण्यात आले असून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.