पिकअपचा पाठलाग करून गोवंशांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 01:12 PM2020-06-18T13:12:04+5:302020-06-18T13:12:49+5:30

संगमनेर : पिकअप या चारचाकी वाहनात निर्दयतेने गोवंश जनावरे भरून त्यांची वाहतूक करणाºयाला जिल्हा वाहतूक शाखेच्या संगमनेर विभागाच्या पथकाने पाठलाग करून पकडले.

Save the cows by chasing the pickup | पिकअपचा पाठलाग करून गोवंशांना जीवदान

पिकअपचा पाठलाग करून गोवंशांना जीवदान

संगमनेर : पिकअप या चारचाकी वाहनात निर्दयतेने गोवंश जनावरे भरून त्यांची वाहतूक करणाºयाला जिल्हा वाहतूक शाखेच्या संगमनेर विभागाच्या पथकाने पाठलाग करून पकडले. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावर कºहे गावच्या शिवारात बुधवारी ( १७ जून) रात्री आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    बबलू गुलाब शेख ( वय २८, रा. कुरण, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉँस्टेबल रफियोद्दीन निजामोद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Save the cows by chasing the pickup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.