संगमनेरात स्टेट बँकेचे एटीएम फोडले; २६ लाख रुपये लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:09 PM2017-11-07T13:09:25+5:302017-11-07T13:11:51+5:30
स्टेट बँक आॅफ इंडियाचे संगमनेर शहरातील मध्यवस्तीत एटीएम आहे. आॅरेंज कॉर्नर येथे हे एटीएम आहे. एटीएमच्या बाहेर एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला होता. चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करण्यापूर्वी या सीसीटीव्ही कॅमे-याची वायर तोडली.
संगमनरे : पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर शहरातील हायवेनजिक मध्यवस्तीत असणारे एटीएम मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी फोडले. या एटीएममधील २६ लाख रुपये चोरट्यांनी लांबविल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
स्टेट बँक आॅफ इंडियाचे संगमनेर शहरातील मध्यवस्तीत एटीएम आहे. आॅरेंज कॉर्नर येथे हे एटीएम आहे. एटीएमच्या बाहेर एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला होता. चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करण्यापूर्वी या सीसीटीव्ही कॅमे-याची वायर तोडली. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएमचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला. कटरच्या सहाय्याने एटीएम तोडून चोरट्यांनी त्यातील २६ लाख रुपये लांबविले. चोरीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, नाशिक येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी बँकेच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत पंचनामा केला आहे. मात्र, एटीएममध्ये नेमकी किती रक्कम होती, याबाबत स्टेट बँकेचे अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत असून, पोलीस सूत्रांकडूनही त्रोटक माहिती मिळत आहे.
दरम्यान या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक का नेमला नव्हता? या एटीएमच्या आतमध्ये कॅमेरा का नव्हता, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.