एमआयडीसीतील निर्यातदारांना योजनांचे पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:23 AM2021-09-27T04:23:09+5:302021-09-27T04:23:09+5:30
अहमदनगर : नागापूर औद्योगिक वसाहतीतील निर्यातदारांना शासकीय योजनांबाबत शनिवारी मार्गदर्शन करण्यात आले. वस्तूंच्या निर्यातीबाबत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची ...
अहमदनगर : नागापूर औद्योगिक वसाहतीतील निर्यातदारांना शासकीय योजनांबाबत शनिवारी मार्गदर्शन करण्यात आले. वस्तूंच्या निर्यातीबाबत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची उद्योजकांना माहिती देण्यात आली.
नागापूर औद्योगिक वसाहतीतील विखे पाटील संचालित आयटीआय महाविद्यालयात जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने निर्यातदरांचे संमेलन नुकतेच झाले. कार्यक्रमास शिवाजी जगताप, विनायक भुसारी, एजी. एम. विनोदकुमार, पी. बी. पानसरे, विनोद देशमुख, राजेंद्र कटारिया, संदीप प्रसाद, प्रकाश लोळगे, गणेश सुपेकर, विजयकुमार राऊत, अमोल धाडगेे, प्रकाश मोटे, टी.पी. जिवडे यांच्या विविध संघटना व क्लस्टरचे पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.
या संमेलनात जिल्ह्यातील निर्यात वाढविण्यासाठी असलेल्या शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक व्ही. आर. यंदे यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे उद्याेग निरीक्षक ए. बी. बेनके यांनी उत्पादन व सेवांच्या निर्यातवाढीसाठी राज्य व केंद्र शासनाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले.
................
सूचना: फोटो २६ एमआयडीसी नावाने आहे.