शिष्यवृत्ती परीक्षा : श्रीरामपूरचा सिद्धेश गोराणे राज्यात प्रथम, राज्य गुणवत्ता यादीत नगरचे २६ विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:35 AM2019-06-20T11:35:03+5:302019-06-20T11:39:24+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत नगर जिल्ह्यातील २६ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत नगर जिल्ह्यातील २६ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. श्रीरामपूर येथील एस. के. सोमैय्या स्कूलचा विद्यार्थी सिद्धेश गोराणे हा प्राथमिक शिष्यवृत्तीत राज्यात पहिल्या स्थानावर आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २४ फेब्रुवारी २०१९मध्ये ही शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा घेतली. त्यात अहमदनगर जिल्ह्यातून प्राथमिकसाठी एकूण ३० हजार ९२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २९ हजार ८३९ जण प्रत्यक्ष परीक्षेस उपस्थित राहिले. यामधून ६ हजार ३८४जण उत्तीर्ण झाले. त्यातील ६७७जण शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.
माध्यमिक गटासाठी जिल्ह्यातून १८ हजार ४१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. पैकी १७ हजार ९८५जणांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातून ३ हजार ५९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी ६५७ जणांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. परीक्षा परिषदेने शहरी, ग्रामीण व सीबीएसई अशा तीन विभागांत ही परीक्षा घेतली. यात प्राथमिक शिष्यवृत्तीसाठी १०, तर माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी १६ अशा नगरच्या एकूण २६ जणांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत एकूण ५३३ जणांचा समावेश आहे.
राज्यस्तरीय यादीत जिल्ह्यातील विद्यार्थी (गुणवत्ता क्रमांकनिहाय)
पाचवी (शहरी)
१) सिद्धेश अण्णासाहेब गोराणे (एस के. सोमैय्या स्कूल, श्रीरामपूर (९७.९७३)
८) अवधूत आदिक जोशी (एस के. सोमैय्या स्कूल, श्रीरामपूर - ९७.२७)
१०) आशितोष अक्षय मुळे (एस. जे. पाटणी विद्यालय, श्रीरामपूर ९४.५९)
२०) श्रुती अशोक कडूस (पारनेर पब्लीक स्कूल, पारनेर ९२.३६)
२१) चैतन्य विजय तावर (रेसिडेन्शिअल हायस्कूल, शेवगाव - ९१.८९)
----------------------------------------------------
ग्रामीण :
५) शार्दूल शिवाजी जाधव (एम. व्ही. अकलापूर, संगमनेर ९५.९४)
१०) प्रणव शहाजी लवांडे (श्री वृद्धेश्वर विद्यालय, तिसगाव, पाथर्डी ९३.९१)
---------------------------------------------------
सीबीएसई :
८) वेदांत संदीप काळोखे (सेंट मायकल स्कूल, नगर - ९०.२७)
९) प्रसाद नितीन निर्मल (प्रीति सुधाजी स्कूल, पिंपळस, ता. राहाता- ८९.५८)
११) रोशन सुशील गुगळे (आयकॉन पब्लीक स्कूल, नगर ८८.१९)
आठवी (शहरी)
१०) अथर्व जगन्नाथ बोडखे (सेंट विवेकानंद स्कूल, नगर ९२.३०)
१२) श्रेया संदीप औटी (पारनेर पब्लीक स्कूल, पारनेर- ९१.६०)
१४) अविनाश सुधीर वाघ (पारनेर पब्लीक स्कूल, ९०.९०)
१५) संस्कृती गणेश कुलांगे (रेशिडेन्शिअल हायस्कूल, नगर ९०.२७)
१५) चिन्मय अनिल पंचारिया (रेणावीकर विद्यालय, सावेडी ९०.२७)
१८) धनश्री संजय पठारे ( श्रीतिलोक जैन विद्यालय, पाथर्डी ८९.५१)
१८) श्रेयस बाळासाहेब बागल (पारनेर पब्लीक स्कूल ८९.५१)
१९) आयुश सुरेश कार्ले (भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, ८८.८८)
१९) तनिष्क गणेश तोटे (भाऊसाहेब गुंजाळ विद्यालय, संगमनेर ८८.८८)
-------------------------------------------------
ग्रामीण :
१८) अभिजित खोले (डॉ. विखे पाटील स्कूल, लोणी ८६.७१)
१८) ऋषिकेश ज्ञानेश्वर घुंग्रड (डॉ. विखे पाटील स्कूल, लोणी ८६.७१)
२२) ऋषिकेश प्रभाकर जोरी (डॉ.विखे पाटील स्कूल, लोणी ८५.३१)
२३) विजय गोराडे (आत्मा मलिक गुरूकुल, कोपरगाव ८४.७२)
२४) आदित्य काकासाहेब तांबे (डॉ. विखे पाटील स्कूल, लोणी ८४.६१)
२५) शुभम जालिंदर नलावडे (आत्मा मलिक गुरूकूल, कोपरगाव ८४.०२)
---------------------------------------------
सीबीएसई : १२) हर्षित बाबरिया (विद्या निकेतन अॅकॅडमी, ८५.३१)