शाळेची घंटा वाजली; मात्र आकडा वाढेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:22 AM2021-09-11T04:22:37+5:302021-09-11T04:22:37+5:30

कोरोनाची स्थिती काहीशी आटोक्यात आल्यानंतर कोरोनामुक्त गावांमध्ये शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. जिल्ह्यात १५ जुलै ...

The school bell rang; But the number did not increase | शाळेची घंटा वाजली; मात्र आकडा वाढेना

शाळेची घंटा वाजली; मात्र आकडा वाढेना

कोरोनाची स्थिती काहीशी आटोक्यात आल्यानंतर कोरोनामुक्त गावांमध्ये शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. जिल्ह्यात १५ जुलै रोजी शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी १६ जुलैला १४९ शाळा सुरू झाल्या. त्यानंतर ३० जुलैअखेर जिल्ह्यात १९४ शाळा सुरू झाल्या होत्या. त्यात १६ हजार ८० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात आठवी ते बारावी एकूण १२४२ शाळा आहेत. त्यात ८५ जिल्हा परिषदेच्या व ११५७ इतर व्यवस्थापन शाळांचा समावेश आहे. ३ सप्टेंबर २०२१च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात २०२ शाळा सुरू असून त्यात १६ हजार ३०० विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. म्हणजे शाळा सुरू होऊन २ महिने झाले तरी सुरू झालेल्या शाळांचा आकडे दोनशेच्या पुढे गेलेला नाही. अजूनही हजाराच्या आसपास शाळा बंद आहेत.

-------------

३४०० शिक्षकांचे लसीकरण

जिल्ह्यात आठवी ते बारावी एकूण १२४२ शाळा असून त्यात ५ हजार ३६९ शिक्षक आहेत. त्यातील ३३८४ शिक्षकांनी कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत.

---------------

तालुकानिहाय सुरू असलेल्या शाळा

अकोले ४३

संगमनेर २७

कोपरगाव ४

राहाता ३३

राहुरी ८

श्रीरामपूर २१

नेवासा १६

शेवगाव १२

पाथर्डी ११

जामखेड ३

कर्जत ६

श्रीगोंदा ४

पारनेर ६

नगर ८

------------

एकूण २०२

--------------

सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?

शाळा सुरू करण्याअगोदर त्या शाळांचे सॅनिटायझेशन करण्याच्या सूचना होत्या. त्याप्रमाणे अनेक गावांत सॅनिटायझेशन झाले. मात्र त्यासाठी खर्चाची तरतूद नाही. त्यामुळे सॅनिटायझेशनचे पैसे द्यायचे कोणी असा प्रश्न अजूनही कायम आहे.

------------

Web Title: The school bell rang; But the number did not increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.