संगमनेर तालुक्यातील वडगाव पानमधील शाळेत भरतेय दारूड्यांची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 05:22 PM2018-05-11T17:22:25+5:302018-05-11T17:22:36+5:30
येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रात्रीच्या वेळेस दारू पिणाऱ्यांची शाळा भरू लागली आहे. त्यामुळे शाळेतील आवारात रात्रीच्या वेळी दारू पिऊन पडणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
वडगाव पान : येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रात्रीच्या वेळेस दारू पिणाऱ्यांची शाळा भरू लागली आहे. त्यामुळे शाळेतील आवारात रात्रीच्या वेळी दारू पिऊन पडणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील गावठाण हद्दीत माळेगांव हवेली रस्त्यालगत जिल्हा परिषद परिषद प्राथमिक शाळा आहे. सध्या शाळेला सुट्टी असल्याने शाळेतील आवार हे दारू पिणाºयांसाठी सोयीचे व विश्रांतीचे ठिकाण बनले आहे. दररोज सायंकाळी सहाच्या नंतर येथील आवारात काही मद्यपी या आवारात येतात व मनसोक्त दारू पिऊन तेथील परिसरात पिऊन झोपताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून येथील परिसरात दारू पिऊन झिंगाट होणाºयांची संख्या वाढत चालली आहे. कधी कधी जास्तच चढली तर कपड्यांमध्येच नैसर्गिक विधी होऊन परिसर अस्वच्छ करून टाकतात. दारू उतरल्यावर ही मंडळी दुसºया दिवशी सकाळीच घरी निघून जातात.
शाळेसारख्या पवित्र मंदिरात ज्ञानदानाचे पवित्र काम चालण्याऐवजी दारू पिऊन झिंगाट होणाºयांमुळे परिसराचे पावित्र्य भंग पावत आहे. शाळेस संरक्षक भिंत नसल्याने शाळेच्या आवारात घुसखोरी करीत दारू पिऊन घाण करणे सोपे झाले आहे. त्यामुळे परिसरात व शाळेच्या मागे दारूच्या बाटल्या नेहमीच निदर्शनास पडतात. दारू पिऊन घाण करणारांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.