उक्कलगाव येथील शाळेच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:22 AM2021-03-23T04:22:03+5:302021-03-23T04:22:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उक्कलगाव : राज्यभर गाजलेल्या गौतम हिरण अपहरण व खून प्रकरणाचा तपास उक्कलगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उक्कलगाव : राज्यभर गाजलेल्या गौतम हिरण अपहरण व खून प्रकरणाचा तपास उक्कलगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील सीसीटीव्ही कॅमे-यामुळे लागला. त्यामुळे अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या व्हॅनपर्यंत पोलिसांना पोहोचता आले. त्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुखांच्या हस्ते शाळेचा नुकताच सन्मान करण्यात आला.
बेलापूर येथील व्यापारी हिरण यांचे १ मार्च रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यांचा मृतदेह एमआयडीसी परिसरात आठ दिवसानंतर मिळून आला होता. पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यास मोठ्या अडचणी आल्या. त्यामुळे त्यांना नागरिकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते.
जिल्हा पोलीस प्रमुख पाटील यांनी स्वत: येथे तळ ठोकून तपासाची चक्रे फिरवली. दिवसरात्र आरोपींचा शोध घेतला. अखेर उक्कलगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील सीसीटीव्ही कामी आला. अपहरणासाठी वापरण्यात आलेली व्हॅन व तिचा क्रमांक कॅमे-यात कैद झाला. बेलापुरातून हिरण यांना व्हॅनमध्ये बसवून आरोपी उक्कलगावमार्गे गेले होते. त्यामुळे सिन्नर येथून आरोपींना जेरबंद करता आले.
गावातील सामाजिक कार्येकर्ते दिलीप थोरात व शाळेचे लिपिक गुलाब गाडेकर यांचा पोलीस मुख्यालयात नगर येथे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
------------