धक्कादायक! शाळकरी मुलीला छतावर नेलं; हात-पाय, तोंड बांधून सोडून दिलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 01:28 PM2024-08-07T13:28:03+5:302024-08-07T13:29:55+5:30

शाळेच्या भिंतीवरून आत आला अन् तिला घेऊन गेला...

Schoolgirl taken to rooftop; He was released with his hands and feet tied | धक्कादायक! शाळकरी मुलीला छतावर नेलं; हात-पाय, तोंड बांधून सोडून दिलं

धक्कादायक! शाळकरी मुलीला छतावर नेलं; हात-पाय, तोंड बांधून सोडून दिलं

अहमदनगर : एका १३ वर्षीय शाळकरी मुलीला छतावर नेऊन तिचे हातपाय व तोंड बांधल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. ५) सायंकाळी समोर आला आहे. तालुक्यातील पिंपळगाव उजैनी परिसरातील एका शाळेतील या घटनेमुळे खळबळ उडाली असून, यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

तिच्यासोबत नेमके काय घडले? 
  मुलीच्या माहितीनुसार, ती तिच्या मैत्रिणीसोबत स्वच्छतागृहात गेली होती. नंतर ती एकटीच पाठीमागे राहिली. त्यावेळी शाळेच्या संरक्षक भिंतीवरून उडी घेऊन एकजण आत आला. त्याने मुलीस बळजबरीने पकडून स्वयंपाक खोलीत नेले. बाहेर असलेल्या मुलांच्या लक्षात येऊ नये, म्हणून आरोपीने मुलीला शाळेच्या छतावर नेले. तिथे त्याने मुलीचे तोंड कापडाने बांधले. हात व पाय तारेने घट्ट बांधून तो मुलीला सोडून निघून गेला. 

पोलिसांनी ताब्यात घेतला मोबाइल 
- मुलीला बाहेरून आलेल्या मुलाने बांधले की, शाळेतील मुलांनीच हे कृत्य केले, याचा तपास पोलिसां करत आहेत.  
- पोलिसांनी मुलीच्या नातेवाइकांची भेट घेऊन चौकशी केली. तपासासाठी तिचा मोबाइलही  ताब्यात घेतला आहे.

ओरडण्याचा आवाज आला अन्... 
तोंड बांधलेल्या स्थितीत मुलीला आवाज काढता येत नव्हता. ती हाताच्या कोपरावर सरकत होती.
शाळेच्या मैदानावर खेळणाऱ्या मुलांना ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी छतावर जाऊन पाहिले असता हा प्रकार समोर आला.
मुलांनी तिचे तोंड सोडल्यानंतर ती रडू लागली. मुलांनी हातपाय सोडून तिची सुटका केली, असे फिर्यादीत म्हटले.

याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. 
- माणिक चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक, एमआयडीसी
 

Web Title: Schoolgirl taken to rooftop; He was released with his hands and feet tied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.