श्रीगोंद्यातील घारगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 01:17 PM2019-02-28T13:17:59+5:302019-02-28T13:18:03+5:30
गेल्या तीन-चार दिवसांपासून घारगाव(ता.श्रीगोंदा) परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.
घारगाव : गेल्या तीन-चार दिवसांपासून घारगाव(ता.श्रीगोंदा) परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.
मंगळवारी(दि.२६) रोजी गावातील बांदल मळा परिसरातील कराळे वस्तीवर पहाटे ३ वाजता विठ्ठल कानडजे यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला. शेजारील उसाच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. कानडजे यांचे दहा ते बारा हजार रुपयांचे नुकसान झाले. वनखात्याकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी विठ्ठल कानडजे यांनी केली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेळीचा मृत्यू झाल्याचे वनरक्षक एच.के.मुंढे यांनी सांगितले. पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन पवार यांनी मृत शेळीची तपासणी केली. आठ दिवसांपासून परिसरात बिबट्याचे दर्शन होत आह. परिसरातील कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे व भीतीचे वातावरण पसरले आहे.