दोन फरार आरोपींचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:14 AM2021-03-29T04:14:44+5:302021-03-29T04:14:44+5:30

संगमनेर : दरोड्याच्या तयारीतील तीन जणांना संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून पकडले होते. आतापर्यंत यातील ...

Search for two absconding accused continues | दोन फरार आरोपींचा शोध सुरू

दोन फरार आरोपींचा शोध सुरू

संगमनेर : दरोड्याच्या तयारीतील तीन जणांना संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून पकडले होते. आतापर्यंत यातील चार जण अटकेत आहेत. दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. यापूर्वीही त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, त्यांनी केलेल्या इतरही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. असे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक देशमुख हे पोलीस कर्मचाऱ्यांसह शनिवारी (दि. २७) गस्तीवर असताना त्यांना तालुक्यातील समनापूर बाह्यवळण रस्ता ते पुणे रस्त्यावर सहा जण संशयितरीत्या वावरत असल्याची माहिती मिळाली होती. वाहनचालकांना रस्त्यात अडवून त्यांच्याकडील मोबाइल, पैसे काढून घेण्याच्या घटना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या होत्या. पोलीस समनापूर बाह्यवळण रस्ता येथे गेले असता संशयितरीत्या वावरत असलेले सहा जण पोलीस आल्याचे पाहून पळू लागले. यातील तीन जणांना पाठलाग करून उसाच्या शेतातून पकडण्यात आले. त्यानंतर शनिवारी दुपारी समनापूर शिवारातून एक अशा एकूण चार जणांना आतापर्यंत पकडण्यात आले असून, दोन जण पसार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे, असेही पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.

------------

पोलीस पथके रवाना

विक्रम रामनाथ घोडेकर (वय २०), अजित अरुण ठोसर (वय १९) (दोघेही रा. पंपिंग स्टेशन, कासारा-दुमाला, संगमनेर), सर्फराज राजू शेख (वय १९, रा. लाल तारा, कॉलनी, अकोले नाका, संगमनेर), कलीम अकबर पठाण, हलीम अकबर पठाण व आसिफ शेख (सर्व रा. जमजम कॉलनी, संगमनेर), अशी गुन्हा दाखल झालेल्या सहा जणांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पोलीस नाईक विजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलीम पठाण व आसिफ शेख हे दोघे पसार आहेत. त्यांच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले तपास करीत आहेत.

Web Title: Search for two absconding accused continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.